Palak Paneer Paratha: पनीर बटर मसाला, पालक पनीर आणि पनीर टिक्का अशा स्वरुपात त्याचा जेवणात समावेश केला जातो. भारतीयांना पनीरचे विविध अन्नपदार्थ खायला खूप आवडतात. परंतु काही लोक ते कच्चे देखील खातात.मात्र आज आम्ही तुमच्यासाठी पालक पनीर पराठा रेसिपी घेऊन आलो आहोत. चला तर पाहुयात घरच्या घरी कसा बनवायचा पालक पनीर पराठा

पालक पनीर पराठा साहित्य –

१५ ते २० पालकाची पाने,

पाव चमचा हिरवी मिरची आणि आल बारीक वाटून

पाव चमचा ओवा, १ वाटी गव्हाचे पीठ, अर्धा वाटी पनीर, १ मोठा चमचा बारीक चिरलेला कांदा, पाव चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, तेल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालक पनीर पराठा कृती –

  • प्रथम पालकाची पाने २ ते ३ मिनिटे उकळत्या पाण्यात घालून त्यातील पाणी निथळून काढा आणि गार झाल्यावर हिरवी मिरची आणि आले टाकून त्याची पेस्ट तयार करा.
  • आता गव्हाच्या पिठात हे मिश्रण व ओवा आणि मीठ घालून कणीक मळून घ्या. तयार कणिक तासभर भिजत ठेवा. गरम कढईमध्ये तेल घालून कांदा गुलाबी रंगावर परतावा.
  • नंतर त्यात गरम मसाला, मीठ आणि किसलेले पनीर घालून चांगले परतून घ्या. हे मिश्रण गार करायला ठेवा.

हेही वाचा – मशरूम मटर मखाना, फक्त १० मिनिटांत, पौष्टिक पण चमचमीत पदार्थ

  • गार झालेले पनीरचे मिश्रण कणकेच्या पारीमध्ये भरा आणि त्याचे पराठे लाटून तव्यावर भाजून गरमागरम सर्व्ह करा.