Ice Tea: उन्हाळा सुरू झाला आहे. कडक ऊन आणि गरम हवेमुळे तुमची उर्जा पूर्णपणे संपते, अशा स्थितीत शरीराला थंडावा देणार्‍या अशा गोष्टी खायला-प्यायला हव्यात. या हंगामात तुम्ही लिंबूपाणी आणि सोडा पितात पण तुम्ही कधी आईस टी ट्राय केला आहे का? नसेल तर एकदा नक्की करून बघा आणि ज्यांनी तो प्यायला नाही त्यांनी त्याची चव जरूर जाणून घ्या. पण बर्‍याच वेळा आईस टीबाबत असे घडते की, तो बाहेर जसा मिळतो तसा तो घरी तयार होत नाही. त्यामुळे आपल्याला ते बाहेर जाऊ प्यावे लागत आहे. पण आज आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आईस टी करण्याची रेसिपी घेऊन आलो आहे, जी तुम्ही घरी सहज करू शकता.

शेफ रणबीर ब्रार यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर या रेसिपी शेअर केल्या आहेत. त्यांनी आईस टी वेगवेगळ्या प्रकारे कसा करायचा हे तर सांगितलेच, पण त्याचे फायदे आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांचे फायदेही सांगितले. चहाच्या पानांव्यतिरिक्त रणबीरने ग्रीन टीपासून आईस टीही तयार केला आहे.

लेमन मिंट आईस टी

ब्लॅक आईस टी करण्यासाठी सर्वप्रथम चहाची पाने पाण्यात उकळून थंड होण्यासाठी बाजूला ठेवावीत. आता एका ग्लासमध्ये लिंबाचा रस घ्या, त्यात पुदिना आणि साखर घाला, चांगले मिसळा आणि नंतर ग्लास वरपर्यंत बर्फाने भरा. मग त्यावर आधीच तयार केलेला चहा ओता. आता वर पुदिना ठेचून लिंबाच्या कापांनी सजवा. तुमचा लेमन आइस टी तयार आहे.


हेही वाचा – उन्हाळ्यात घ्या कोल्ड कॉफीचा आनंद! कशी तयार करावी, जाणून घ्या ५ टिप्स

पीच आईस टी

पीच आईस टी करण्यासाठी, प्रथम एका ग्लासमध्ये लिंबाचा रस घाला, नंतर चिरलेला पीच आणि साखर घाला आणि ठेचून घ्या. यानंतर, ग्लास बर्फाने भरा आणि आधीच तयार केलेला चहा घालून तयार करा. त्यावर पीचचे तुकडे आणि पुदिना टाकून सजवा.

हेही वाचा – ३ हटके पद्धतीने घरीच तयार करा लिंबू पाणी; उन्हाळ्यासाठी सर्वात्तम पेय

वाटरमेलनआईस टी

ते करण्यासाठी एका ग्लासमध्ये थोडी साखर आणि आले कुस्करून घ्या. नंतर त्यात वाटरमेलन टाकून तेही कुस्करून घ्या. आता त्यात मध आणि तुळशीच्या बिया टाका. आता बर्फ आणि चहा घालून मिक्स करा. तुमचा वाटरमेलन आईस टी तयार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा आईस टी पाहून तुम्हालाही तो प्यायची इच्छा झाली असेल तर आता उशीर न करता आईस टी तयार करा आणि उन्हाळ्याचा आनंद घ्या.