How to Make Roti Pizza : पिझ्झा पदार्थ पाश्चत्य देशातील असला तरी भारतातही तितक्याच आवडीने खाल्ला जातो. नुसतं पिझ्झा म्हटलं तरी लोकांच्या तोंडाला पाणी सुटते. पिझ्झा खाण्यासाठी लोकांना काही कारण लागत नाही, इच्छा झाली की पिझ्झा मागवायचा आणि खायचा. पण ज्यांनी निरोगी राहायचे आहे किंवा वजन कमी करायचे आहे अशा लोकांना इच्छा असूनही पिझ्झा खाणे टाळावे लागते कारण पिझ्झामध्ये वापरला जाणारा बेस हा मैद्याचा असतो आणि मैदा हा पचायला जड असतो आणि फॅट्स देखील वाढवू शकतो. तुम्हालाही जर मैद्याचा पिझ्झा नको असेल तुम्ही पोळीचा पिझ्झा खाऊ शकतो. गव्हाच्या पिठाची तुम्ही पिझ्झा बेस म्हणून वापरू शकता आणि त्यावर भरपूर भाज्यांचा वापर करू शकता. तुम्ही रात्री उरलेल्या पोळीपासून देखील पिझ्झा बनवू शकता. लहान मुलांना देखील हा पिझ्झा नक्की आवडेल.

घरी उरलेल्या पोळी किंवा चपातीचा झटपट पिझ्झा कसा बनवावा जाणून घ्या

साहित्य-
२ उरलेल्या किंवा ताज्या रोट्या
१ टीस्पून ऑलिव्ह ऑईल किंवा बटर किंवा कच्चे लोणी
१/२ कप चिरलेला कांदा
१/४ कप चिरलेली सिमला मिरची
१/२ कप पनीर, चौकोनी तुकडे करा
१/२ कप चिरलेला टोमॅटो.
१/२ टीस्पून काळी मिरी
१ टीस्पून इटालियन किंवा पिझ्झा मसाला
१ टीस्पून चिली फ्लेक्स
३/४ कप किसलेले मोझेरेला चीज
२ चमचे टोमॅटो केचप किंवा पिझ्झा सॉस.

हेही वाचा – पाण्यात तळलेली पुरी? एक थेंबही तेल न वापरता कशी बनवू शकता टम्म फुगलेली पुरी? पाहा Video

हेही वाचा – Video : रोज पोहे, उपीट खाऊन कंटाळा आलाय का? मग १ कप रव्यापासून बनवा कुरकुरीत नाश्ता! ही घ्या रेसिपी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृती

सर्वात आधी एका भांड्यात चिरलेला कांदा, चिरलेली शिमला मिरची, चौकोनी काप केलेले पनीर, चिरलेले टोमॅटो, १/२ टीस्पून काळी मिरी, १ टीस्पून इटालियन किंवा पिझ्झा मसाला, १ टीस्पून ऑलिव्ह ऑईल किंवा बटर किंवा कच्चे लोणी, १ टीस्पून चिली फ्लेक्स, मीठ टाकून एकत्र करू घ्या. त्यानंतर एका चपातीला टोमॅटो केचप किंवा पिझ्झा सॉस लावून घ्या. त्यावर किसलेले मोझेरेला चीज टाका. त्यानंतर तयार भाज्या पोळीवर सर्वत्र पसरवून घ्या. त्यावर पुन्हा चीज टाका. आता गॅसवर तवा गरम ठेवा त्यात बटर टाकून रोटी पिझ्झा गरम करण्यासाठी ठेवा, त्यावर झाकण ठेवा. मंद आचेवर ७ ते ८ मिनिटे तसेच ठेवा. चिज वितळल्यानंतर पोळीचा पिझ्झा ताटात ठेवा. त्यावर चिली फ्लेक्स टाकू शकता. गरमा गरम पोळी पिझ्झाचा आनंद घ्या