Rava Uttapam Recipe : दररोज सकाळी नाश्त्यात काय बनवावं, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. तुम्ही नेहमी नेहमी उपमा, डोसा, पोहे खाऊन कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला एक हटके रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही उत्तपा बनवू शकता. तुम्हाला वाटेल उत्तपा हा पदार्थ वेळेवर झटपट तयार करता येत नाही. पण तुम्ही रव्याचा उत्तपा बनवू शकता. हा झटपट होणारा पदार्थ आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी एक चांगला पर्याय आहे. अगदी १० मिनिटांममध्ये तुम्ही रव्याचा उत्तपा बनवू शकता. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सर्वांना आवडेल असा हा पदार्थ आहे. रव्याचे तुम्ही अनेक पदार्थ खाल्ले असेल पण रवा उत्तपाची चव अप्रतिम वाटते. तुम्ही एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल. तुम्हाला प्रश्न पडला असेल की रवा उत्तपा कसा बनवायचा, तर अगदी सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला खालील रेसिपी नोट करावी लागेल.

साहित्य

 • रवा
 • मीठ
 • सोडा
 • दही
 • पाणी
 • तेल
 • कांदा लसूण मसाला
 • हिरव्या मिरचीचे तुकडे
 • बारीक चिरलेली कोथिंबीर
 • बारीक चिरलेला कांदा
 • बारीक चिरलेले हिरव्या मिरचीचे तुकडे

हेही वाचा : Breakfast Recipe : एक वाटी तांदळाच्या पिठापासून बनवा हा टेस्टी नाश्ता, लगेच रेसिपी नोट करा

how to make fish egg omelette Fish egg recipe in marathi
झटपट नाश्त्यासाठी बनवा “माशाच्या अंड्याचे ऑमलेट” लहान मुलंही खातील आवडीने
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
World idli day 2024 how to make healthy oats idli
World idli day : पौष्टिक अन् झटपट नाश्त्यासाठी बनवा ‘ओट्स’ इडली; पाहा रेसिपी, प्रमाण
simple tips and yoga to reduce PCOS problem
स्त्रियांनो, ‘PCOS’ चा त्रास कसा कराल कमी? आराम मिळण्यासाठी समजून घ्या तज्ज्ञांनी सुचविलेली ही पाच आसने

कृती

 • एक कप रवा घ्या.
 • त्यात अर्धा चमचा खायचा सोडा टाका.
 • त्याच मीठ चवीनुसार टाका.
 • त्यानंतर त्यात अर्धा कप दही घाला आणि मिश्रणात नीट एकत्र करा.
 • त्यात पाणी घाला आणि डोसाच्या मिश्रणापेक्षा थोडे घट्ट असे मिश्रण तयार करा.
 • त्यानंतर गॅसवर तवा ठेवा.
 • गरम तव्यावर तेल टाका आणि तव्यावर तेल चांगले पसरून घ्या जेणेकरून उत्तपा तव्यावर चिकटणार नाही.
 • त्यानंतर उत्तपाचे मिश्रण तव्यावर घाला.
 • त्यानंतर उत्तपा एका बाजून थोडा फार शिजला की त्यावर कांदा लसूण मसाला टाका.
 • त्यानंतर बारीक चिरलेले हिरवे मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा टाका
 • त्यानंतर कांदा चमच्याने त्यावर दाबून घ्यायचा.
 • त्यानंतर उत्तप्यावर थोडं तेल टाका.
 • तीन ते चार मिनिटानंतर उत्तपा पालटून घ्या.
 • जाळीदार अन् कुरकुरीत असा उत्तपा तयार होईल.
 • हा उत्तपा तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीबरोबर खाऊ शकता.