scorecardresearch

आंबट-गोड, तिखट चवीची चटपटीत कैरीची चटणी; वाढवेल जेवणाची लज्जत, ही घ्या सोपी चविष्ट रेसिपी

raw mango chutney : दुपारच्या जेवणाची लज्जत वाढवायची असेल तर जेवणासोबत कैरीची चटणी ट्राय करायला विसरू नका.

raw mango chutney
चटपटीत कैरीची चटणी (सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

कैरीचं नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. उन्हाळा आला की आपसूकच काहीतरी आंबटगोड खावंसं वाटतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने कैरीचे वेगवेगळे पदार्थ खाण्याचा आनंद घेतात. अशातच बाजारात कैऱ्यांची आवाक् सुरू झाली की घरातही कैरीपासून तयार होणाऱ्या पदार्थांची रेलचेल वाढते. उन्हाळ्यात फारसे काही खायची इच्छा होत नाही. मग रोज तेच ते जेवण कंटाळवाणे वाटते. दुपारच्या जेवणाची लज्जत वाढवायची असेल तर जेवणासोबत कैरीची चटणी ट्राय करायला विसरू नका.

चला तर मग कशी तयार करायची कैरीची चटणी ते जाणून घेऊया.

कैरीची चटणी साहित्य –

  • १ कैरी, २ मोठे टॉमॅटो १ कांदा
  • ५-६ लसूण पाकळ्या, १ इंच आलं
  • २ चमचे तिखट, दाण्याचा कूट
  • गूळ, १ कप व्हिनेगर
  • १ वाटी साखर, चवीनुसार मीठ
  • फोडणीसाठी तेल, हळद, हिंग, मोहरी, कोथिंबीर

कैरीची चटणी कृती –

कैरीच्या साली काढून किसून घ्या. टोमॅटो व कांदा बारीक चिरुन घ्यावा. त्यात लसूण, दाण्याचा कूट, तिखट, मीठ, गूळ एकत्र करुन जाडसर वाटावे. वाटलेली चटणी बाऊलमध्ये काढून घ्या व त्याला चांगली खमंग फोडणी द्यावी. ही चटणी जरा पातळसर होते. पाच-सहा दिवस चांगली टिकते.

हेही वाचा – तुमचीही मुलं चपाती खायला कंटाळा करतात? मग बनवा ही झटपट चायनीज रोटी

ही कैरीची चटणी तुम्ही पराठ्यासोबत, डोश्यासोबत किंवा चपातीसह सर्व्ह करू शकता. ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा व कशी होते कळवा!

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 17:13 IST

संबंधित बातम्या