श्रावण महिन्यात अनेकजण उपवास करतात. यात श्रावणात विशेषत: सोमवार, शनिवारी उपवास करण्याची पद्धत आहे. पण या उपवासाच्या दिवशी अनेकांना काय खावे असा प्रश्न पडतो. यात नेहमी बटाट्याची भाजी, वरईचा भात किंवा रोटी, साबूदाण्याची खिचडी, उपवासाच्या भाजणीचे थालीपीठ खाऊन खूप वैगात येतो. यात आज श्रावणी शनिवारनिमित्त असलेल्या उपवासासाठी काहीतरी स्वादिष्ट, चवदार, खुसकुशीत रेसिपी शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक सोपी रेसिपी आणली आहे. ती रेसिपी म्हणजे उपवासाचे अनारसे. घरच्या घरी वरीच्या पीठापासून हे अनारसे कसे बनवता येतात जाणून घेऊ…. साहित्य १) वरीचे तांदूळ आवश्यकतेनुसार२) साखर किंवा गूळ३) खसखस४) तूप कृती : ज्या दिवशी अनारसे बनवायचे असतील त्याच्या तीन दिवस आधी वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवा. त्यानंतर ते तांदूळ चांगले गाळून कपड्यावर अर्धवट वाळवा. त्यानंतर तांदूळ खलबत्त्यात चांगले बारीक कुटून घ्या. यात जेवढे पीठ त्याच्या निमपट साखर किंवा गूळ आणि तुपाचे मोहन घालून पीठ चांगले भिजवून झाकून ठेवा. यानंतर दुसऱ्या दिवशी नेहमी अनारसे करतो तसे अनारसे थापा. आता तयार अनारस्यांवर खसखस लावून ते लालासर रंग येईपर्यंत नीट तळून घ्या. अशाप्रकारे तुम्ही आज श्रावणी शनिवारनिमित्त उपवासाचे अनारसे ट्राय करुन बघा.