आज जागतिक दूध दिन, प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी आणि फिटनेससाठी दूध अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण दूधात सर्व प्रकारचे पोषकतत्त्व असल्याने त्याचं सेवन केलं तर त्याचा शरीराला मोठा फायदा होतो. दुधाचे सेवन प्रत्येकाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. विशेषत: मुलांच्या चांगल्या वाढीसाठी दूध महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र हीच लहान मुलं दुध पिताना तोंड वाकडं करतात, लहान मुलंच नाहीतर मोठेही दुध प्यायला नकार देतात. मात्र आज जागतिक दूध दिनानिमित्त आम्ही तुमच्यासाठी दुधापासून तयार केल्या जाणाऱ्या काही रेसिपी घेऊन आलो आहोत. चला तर बघुया दुधापासून कोणकोणत्या रेसिपीज आपण तयार करु शकतो.

बनाना मिल्कशेक

केळी आरोग्यासाठी गुणकारी मानली जाते. जेव्हा त्याबरोबर दूधही घेतले जाते तेव्हा ती आणखीन आरोग्यदायी होते. बनाना शेक पिण्याचे अनेक फायदे आहेत. त्याच्या सेवनाने पचन क्रियेच्या समस्येपासून बचाव होऊ शकतो.

printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Man wraps utensils in plastic to avoid washing them.
भांडी घासावी लागू नये व्यक्तीने शोधला भन्नाट जुगाड! हर्ष गोयंकांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ
funny Puneri patya video
“फुकटच्या फुलांनी देवपूजा केल्यास..” पुणेरी पाटी चर्चेत; नेटकरी म्हणाले, “पुणेकर होण्यासाठी ..”
MPSC interview
‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…

बनाना मिल्कशेक साहित्य

  • २ केळं (2 Ripe Banana)
  • १ वाटी दूध (1 Cup Milk)
  • २ चमचे साखर ( 2 tsp Sugar)
  • १ चमचा मध (1 tsp Honey)
  • २-३ बर्फाचे तुकडे ( 2-3 Ice cubes)
  • सुका मेवा

बनाना मिल्कशेक कृती

सर्वप्रथम केळाचे साल काढून घ्यावे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात केळाचे बारीक तुकडे करून टाकावे आणि त्यात २-३ चमचे दूध घालून केळं बारीक दळून घ्यावेत, नंतर त्यात राहिलेले दुध, साखर,मध, बर्फाचे तुकडे घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. नंतर एका ग्लास मध्ये काढून घ्यावे वरून बदामाचे काप घालावे त्यावर थोडे मध घालून सजवावे, बनाना मिल्कशेक पिण्यासाठी तयार आहे.

तुकडा खीर रेसिपी

तुकडा खीर साहित्य –

  • दूध
  • तांदळांची बारीक कणी २ कप
  • ओलं खोबरे किसून १ कप
  • साखर २ कप, तूप २ कप
  • वेलची पूड १ चमचा, सुका मेव्याचे काप २ मोठे चमचे

तुकडा खीर रेसिपी –

प्रथम एक लिटर दूध घ्या. दूध मंद आचेवर उकळायला ठेवा. दूध तव्याच्या तळाला चिकटणार नाही याची काळजी घ्या. दूध वारंवार ढवळत राहा. चार कप पाणी उकळण्यास ठेवा. त्यात ओलं खोबरं टाका. उकळी आल्यावर तूप, तांदळाची कणी टाका. ती शिजल्यानंतर त्यात साखर टाका. तूप सूटेपर्यंत खीर शिजवा. नंतर ताटाला तूप लावून खीर थापा. थंड झाल्यावर त्याचे तुकडे पाडा. त्यानंतर फ्रीजमध्ये थंड करून खाऊ शकता.

हेही वाचा – Vat Purnima 2023: वटपोर्णिमा स्पेशल व्हेज थाळी; पाहा पुरणपोळीसह संपूर्ण स्वयंपाकाची सोपी रेसिपी

दुधाची बर्फी साहित्य :

  • दूध २ लिटर
  • दूध पावडर १ वाटी
  • साखर १ वाटी
  • देशी तूप १ चमचा
  • बारीक चिरलेले बदाम व पिस्ता, दोन चमचे
  • दुधाची बर्फी बनवण्याची पद्धत

दुधाची बर्फी कृती –

सर्वप्रथम दूध एखाद्या जाड तळाच्या भांड्यात काढा. जेव्हा ते मोठ्या आचेवर उकळते तेव्हा चमच्याने दूध ढवळून घ्या. गॅसवर मोठ्या आचेवर दूध पूर्ण घट्ट होईपर्यंत शिजवा. दूध घट्ट होऊ लागले की त्यात मिल्क पावडर घाला. मिश्रणात साखर घालून चांगले मिक्स करा. सुगंधासाठी त्यात वेलची पावडर घाला. मोठ्या थाळीत किंवा ट्रेवर देशी तूप लावून त्यावर ग्रीस करून गुळगुळीत करा. आता दुधाचे खूप घट्ट मिश्रण एका प्लेटवर फिरवून चमच्याने गुळगुळीत करा. वर चिरलेले बदाम आणि पिस्ते टाका. आता सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. सुमारे एक तासानंतर त्याचे चौकोनी किंवा डायमंडच्या आकाराचे तुकडे करा.

हळद दूध –

हळद आणि दूधाचा खूप फायदा होतो. हळद हा एक असा घटक आहे, जो प्रत्येक घरात मसाल्याच्या डब्यात असतोच. हळदीत आयुर्वेदिक गुणधर्म भरपूर आहेत. याशिवाय अॅंन्टी- सेफ्टीक आणि अॅन्टी बायोटिक गुणधर्म असतात. याचबरोबर दूधालाही कॅल्शिअमचा मोठा स्त्रोत मानला जातो. त्यामुळे दूध आणि हळद एकत्र आले तर याचे गुणधर्म आणखी वाढतात. दूध आणि हळदीत कॅल्शिअम, आर्यन, सोडियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फायबरची मात्रा असते. यामुळे शरीरातील अनेक समस्यांना तोंड देण्यास मदत करतात.

हळदीचं दूध बनवण्याची योग्य पद्धत

  • एक कढई घ्या आणि त्यात थोडे तूप घाला.
  • आता त्यात हळद घाला. मंद आचेवर काही सेकंद शिजू द्या.
  • आता त्यात एक चिमूटभर काळी मिरी, जायफळ पावडर आणि दालचिनी पावडर मिसळा.
  • गॅस बंद करा आणि एक कप गरम दूध घाला आणि चवीनुसार साखर घातल्यानंतर प्या.

या सगळ्या रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशा होतात हे आम्हाला कळवा