मानवी लैंगिक वर्तनाचा समावेश असलेल्या मानवी लैंगिकतेच्या सर्व पलूंचे परीक्षण नतिक दृष्टिकोनातून करणारी नीतिशास्त्राची शाखा म्हणजे कामसंबंधाचे नीतिशास्त्र.
उपयोजित नीतिशास्त्र ज्या अनेक नतिक समस्यांच्या प्रांतांची चिकित्सा करते आणि उपाय सुचवू पाहते त्या सर्व प्रांतांतील अतिप्राचीन प्रांत म्हणजे मानवी कामसंबंधाची रचना. विवाह व कुटुंबसंस्थेमुळे मानवी कामसंबंधाचे स्वरूप जितके सरळ दिसते, तितके वास्तवात सरळ नाही. नतिकतेचा प्रश्न जिथे अतिशय उग्र, वादग्रस्त, तापट आणि सर्वाधिक संवेदनशील बनतो ते हे क्षेत्र आहे. नतिक म्हणजे विवाहसंमत संबंध आणि अनतिक म्हणजे विवाहबाहय़ संबंध (विबासं) असा ढोबळ, पण कडक निकष असणारा हा लोकमान्य लोकप्रिय प्रांत आहे. (‘विबासं’ या नावाची अरुण म्हात्रेची अंतर्मुख करणारी कविता आहे.) ‘इतर मानवी व्यवहारांत अनतिकता असते, त्याचाही गंभीर विचार केला पाहिजे’, असा विचारच माणसाला सुचू देत नाही, इतका या प्रांतातील नतिक निकषाचा विचार भयानक मजबूत, शक्तिशाली आणि मेंदू बंद करणारा असतो.
एखादी व्यक्ती कितीही लबाड, गुन्हेगारी वृत्तीची असली, पण विबासं कृती करीत नसेल, तर ती नतिक व्यक्ती आणि एखादी व्यक्ती सचोटीची, प्रामाणिक, कर्तव्यकठोर असली, पण विबासं कृती करीत असेल, तर ती अनतिक, ढोंगी मानली जाते. शिक्षण, उच्च प्रशिक्षण, समजूतदारपणा, अभिवृत्ती, शहाणपणा, प्रज्ञान इत्यादी काहीही नसलेल्या सामान्य माणसालाही ही बांधेसूद अनतिकता समजते.
 दोन व्यक्तींमधील कामसंबंध एका सूत्रबद्ध व्यवस्थेत बांधून टाकण्यासाठी लग्न आणि कुटुंबसंस्थेची रचना झाली. त्याच वेळी विबासंकृत अनतिकतेचा उगम झाला; पण मुळात कुटुंबसंस्थेतून सर्व संस्कृतींतील वर्ण, जात-जमाती आणि िलगभेदाच्या शोषणाचा पाया रचला गेला. Family  आणि ‘कुटुंब’ या संस्कृत-मराठी शब्दाचा मूळ अर्थ घरगुती गुलाम, वेठबिगार. (कुटुंबव्यवस्थेत थोडेफार काही चांगले असते, तर सुटुंबव्यवस्था म्हटले असते! )  
 ब्रह्मचर्य, हस्तमथुन, विवाह, प्रजनन, गर्भनिरोधन, कपटप्रणयचेष्टा (flirting), लैंगिक स्वैराचार, जारकर्म, तात्पुरते कामसंबंध, लैंगिक छळ, पाशवी वर्तन, विनंती संभोग, भावनिक ब्लॅकमेिलग, विनयभंग, बलात्कार तसेच वेश्यागमन, समिलगी संबंध, जबरी संबंध, लिव्ह इन रिलेशन, अगम्य आप्तसंभोग (इन्सेस्ट- निकटच्या निषिद्ध नात्यांमधील विवाह किंवा इतर लैंगिक संबंध), लैंगिक अपमार्गण (पॅराफिलिआ), अश्लील साहित्यांचा उपभोग आणि विविध लैंगिक विकृती व आजार या व अशा इतर अनेक संकल्पनांचा अचूक शोध घेणे, त्यांचे नेमके अर्थ निश्चित करणारी उपयोजित तत्त्वज्ञानाची शाखा म्हणजे लैंगिकतेचे तत्त्वज्ञान (the philosophy of sexuality) ही नवी विद्याशाखा. संकल्पनांचे अर्थ निश्चित झाले की, त्यांचा अभ्यासाचा, चिंतनाचा आणि मानवी आरोग्य व जीवन सुधारण्याचा मार्ग खुला होतो. हे महत्त्वाचे कार्य लैंगिकतेचे तत्त्वज्ञान करते.
लैंगिकतेच्या तत्त्वज्ञानाची दोन गृहीत तत्त्वे आहेत. एक- कामानंद व कामसमाधान मिळवून देणाऱ्या मानवी कृती आणि इच्छा शोधणे. दोन- या मानवी कृती आणि इच्छा केवळ कामानंद व कामसमाधान देणाऱ्या नसून नवी माणसे जगात आणणे, म्हणजे मानवजात टिकविणे याच्याशी निगडित आहेत, हे लक्षात आणून देणे. लैंगिकतेचे तत्त्वज्ञान वरील संकल्पनांचा व आनुषंगिक मुद्दय़ांचा सांकल्पनिक आणि आदर्शवादी असा दोन प्रकारचा शोध घेते.
सांकल्पनिक शोध म्हणजे कामेच्छा आणि कामकृती या मूलभूत कल्पना स्पष्ट करणे; त्यांच्या व्याख्या, मर्यादा, त्यातील भावी संशोधन यांचे विश्लेषण करणे. जसे की, एखादी इच्छा कामेच्छेत रूपांतरित होते म्हणजे नेमके काय घडते किंवा फसवून कामोपभोग घेणे आणि अिहसक बलात्कार या संकल्पना व त्याप्रमाणे होणारी कृती यात नेमका फरक काय आहे? यांचे विश्लेषण करणे. (उदाहरणार्थ बटरड्र रसेलचे लग्नाबद्दलचे मत.)    
आदर्शवादी शोध म्हणजे कामेच्छा, कामकृती व कामसमाधान यांच्या नतिक मूल्यमापनाची कसोटी रचणे. या कसोटय़ा शोधणे, रचणे, त्यांच्या समर्थनाचे युक्तिवाद रचणे हे मोठय़ा जिकिरीचे, अवघड आणि नाजूक काम असते. थोडक्यात, लैंगिकतेचे तत्त्वज्ञान दोन हेतू सांगते. पहिला- मानवी जीवन गुणवान, शुभ पातळीला नेण्यात मानवी लैंगिकता कोणते योगदान देते आणि कामकृती करताना कोणती नतिक बंधने पाळणे आवश्यक व अनिवार्य आहे, याची मांडणी करणे. दुसरा- आपली कामकृती व आपले कामसमाधान साधताना समाजातील इतरांशी संवाद कसा करावा, त्याकरिता कोणती नतिक जबाबदारी पार पाडावी याची मांडणी करणे.
या दोन्ही हेतूंमधून कामसंबंधाचे नीतिशास्त्र निष्पन्न होते. मानवी लैंगिक वर्तनाचा समावेश असलेल्या मानवी लैंगिकतेच्या सर्व पलूंचे परीक्षण नतिक दृष्टिकोनातून करणारी नीतिशास्त्राची शाखा म्हणजे कामसंबंधाचे नीतिशास्त्र. (सेक्सुअल एथिक्स, सेक्स एथिक्स किंवा सेक्सुअल मॉरॅलिटी). विवाहपूर्व, विवाहोत्तर, विवाहित स्थितीतील लैंगिक संबंधातून िलगभेद आणि सत्तास्पर्धा कशी व्यक्त होते, त्याचा वेध हे नीतिशास्त्र घेते. व्यक्तिगत आणि व्यापक सामाजिक आरोग्यावर िलगभेद आणि सत्तास्पर्धा कशी परिणाम करते, याचाही शोध यात घेतला जातो.
कामसंबंधाच्या नीतिशास्त्राच्या मुख्य तीन भूमिका मानल्या जातात. (१) नतिक शून्यवाद (मुळात चांगले आणि वाईट असे काहीच नसते, सारे निर्थकच असते.) (२) नतिक सापेक्षतावाद (नतिकता व्यक्ती, परिस्थिती, संस्कृती देशकालसापेक्ष असते. त्यातून सार्वत्रिक नियम बनविता येत नाहीत.) (३) नतिक सार्वत्रिकवाद (नतिकता सार्वत्रिक असते आणि ती सक्तीची असते.) याशिवाय सुखवाद, उपयुक्ततावाद, कर्तव्यवाद, व्यक्तिवाद, उदारमतवाद (परस्पर सहमतीने होणारा कामसंबंध नतिकदृष्टय़ा समर्थनीय मानणे), आधुनिकतावाद (परस्पर सहमतीने, कृतीची पूर्ण जाणीव असणारा, बांधीलकी मानणारा आणि प्रेमभावनेने युक्त असणारा कामसंबंध नतिकदृष्टय़ा समर्थनीय मानणे) हे आणखी नतिक सिद्धान्त आहेत. चंगळवाद, व्यापारीकरण, व्यावसायिकीकरण, औद्योगिकीकरण इत्यादी नव्या आíथक बाजूंमुळे लैंगिक वर्तन गुंतागुंतीचे बनले आहे. लैंगिक सुख ही विक्री वस्तू बनविली गेल्याने व्यक्तिगत आणि सामाजिक आरोग्य हा प्रश्न अधिक उग्र बनला आहे. विवाह व कुटुंबसंस्थेच्या रचनेवर धर्मसंस्थेच्या वर्चस्वाने विधायक आणि विघातक (देवदासी) परिणाम केले आहेत. या सर्व आíथक, धार्मिक, सांस्कृतिक, जैविक, वैद्यकीय, सामाजिक, राजकीय बाजूंचा अभ्यास कामसंबंधाच्या नीतिशास्त्रात होतो.
 हे सारे पलू लक्षात घेता कामनीतीविषयक पारंपरिक आणि विविध आधुनिक युक्तिवादांचा समाजातील विविध सामाजिक संस्थांवर आणि मानवी वर्तनावर काहीएक परिणाम होतो. त्यामुळे या युक्तिवादांचे गुणधर्म आणि त्यांच्या त्रुटी यांचे मूल्यमापन, कामनीतीविषयक विविध पातळ्यांवर होणारी चर्चा आणि समकालीन लैंगिक वर्तनाचे प्रकार यांचे विश्लेषण, त्यासाठी विविध नतिक संकल्पना आणि सिद्धान्त यांचे उपयोजन ही कामसंबंधाच्या नीतिशास्त्राची उद्दिष्टे बनतात. स्त्रीवादाने या नीतीचे यातील पुरुषी वर्चस्व नाकारले आणि नव्या नीतीची मागणी केली.
भारतात कामनीतीचा एकात्म, बांधेसूद विचार आहे. त्यातून व्यापक सर्व समाजाला, जातीजमातींत लागू पडेल, अशी ज्ञानाची खुली परिस्थिती नाही. काम एकीकडे विश्वाचे आदिबीज आणि माणसाचा पुरुषार्थ बनला. दुसरीकडे षड्रिपूंमध्ये काम हा मुख्य शत्रू आहे! कामविषयक (आणि एकूण) सर्व ज्ञानाचे साहित्य अतिशय अवघड रचनेत, किचकट रीतीने, लोकभाषा प्राकृतऐवजी संस्कृतात लिहिले गेले. कामशास्त्र, तंत्रशास्त्र गुप्त ठेवल्याने त्यात नवीन सुधारणा, नवा तपास, संशोधन, प्रगती शून्य झाली. सगळे तत्त्वज्ञान, साहित्य इत्यादी वर्ण, जात आणि िलगभेद यांनी ग्रस्त झाल्याने सर्वसामान्य लोकांत म्हणजे सर्व जातीजमातींत कोणत्याही ज्ञानाचा योग्य, यथार्थ प्रसार-प्रचार झाला नाही. आचरणात नीट काही उतरले नाही. त्यात कामशास्त्रही आहे. कामशास्त्र हा चांगल्या, समृद्ध जीवनाचा आराखडा देणारा ग्रंथ आहे, हे वाचल्याशिवाय कसे कळणार?

*लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.
*या पानावरील सदरांचा क्रम अनवधानाने बदलला गेल्यामुळे ‘तत्त्वभान’सदरातील हा लेख गुरुवारऐवजी आजच्या अंकात आहे. माधव गाडगीळ यांचे ‘उत्क्रांतीयात्रा’ हे पाक्षिक सदर, २६ डिसेंबरच्या शुक्रवारी प्रसिद्ध होईल.

Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
scholarship
स्कॉलरशीप फेलोशीप: उच्च शिक्षणातील संशोधनात्मक पद्धती
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान