
कीर्तनभक्तीसारखे लोकशिक्षणाचे खुले व्यासपीठ गतिमान बनवत नामदेवरायांनी ज्ञानाचा दीप प्रज्ज्वलित केला.


कथारूपी त्रिवेणीसंगमात न्हायले की मग वरकड तीर्थाप्रमाणे संकल्प-प्रायश्चित्तांच्या जाळ्या-जळमटांमध्ये गुरफटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.





शैवाद्वयाची जीवनदृष्टी आणि परतत्त्वाच्या सगुण-निर्गुण अभिव्यक्तीचे समरूपत्व पंजाबापर्यंत पोहोचले ते नामदेवरायांच्या माध्यमातूनच.




अहिक्य विठ्ठल परम विठ्ठल निरंतर विठ्ठल तारीता हे त्यांचे अनुभूतीसंपन्न उद्गार द्योतन करतात त्याच वास्तवाचे.

ही बाब चिरंतन स्मरणात ठेवण्यातच नामसाधनेचे गाभासूत्र आहे. आता, उपासना म्हटल्यानंतर काही क्रिया-उपचार स्वाभाविकच ठरतात.