पश्चिम बंगालचा अखेरचा कम्युनिस्ट मुख्यमंत्री ही ओळख बुद्धदेव भट्टाचार्य यांना कधीही आवडली नसती. राज्यात सर्वात दीर्घकाळ मुख्यमंत्रीपदी राहिलेले, माकपचे धुरंधर नेते ज्योती बसू यांनी २००१च्या विधानसभा निवडणुकीच्या आदल्या वर्षी, म्हणजे २००० मध्ये भट्टाचार्य यांची आपला वारस म्हणून निवड केली. त्यानंतर २००१ आणि २००६ मध्ये सत्ता कायम राखून भट्टाचार्य यांनी बसू यांचा निर्णय सार्थही ठरवला.

भट्टाचार्य यांनी आपल्या दीर्घ कारकीर्दीत महत्त्वाच्या राजकीय भूमिका बजावल्या. मात्र, तरीही ते लक्षात राहिले सिंगूर आणि नंदीग्राममध्ये फसलेल्या औद्याोगिकीकरणाच्या प्रयत्नांसाठी. पश्चिम बंगालमध्ये भूसुधारणा कायदा राबवल्यामुळे डाव्या पक्षांची पाळेमुळे घट्ट रोवली गेली होती. मात्र, भूसुधारणेच्या पुढे जाऊन एके काळी श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या राज्यात उद्याोग आले पाहिजेत हे लक्षात घेऊन भट्टाचार्य यांनी टाटा उद्याोग समूहाला सिंगूर येथे नॅनो कार प्रकल्पासाठी ९९७ एकर जमीन देऊ केली. दुसरीकडे नंदीग्राम येथे विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) तयार करून तिथे रासायनिक हब उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी १० हजार एकर जमीन ताब्यात घेतली जाणार होती. दोन्ही ठिकाणी शेतजमिनीचे अधिग्रहण आवश्यक होते. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी दोन्ही प्रकल्पांना जोरदार विरोध केला. पाहता पाहता त्याविरोधात मोठ्या प्रमाणात जनमानस तयार झाले. एके काळी भूसुधारणा करणारे कम्युनिस्ट पक्षच जमीन हडप करू पाहत आहेत हा संदेश दूरपर्यंत पोहोचला.

Keshavrao Bhosale Theater Kolhapur Gutted by Massive Fire in Marathi
अग्रलेख : संचिताचे जळीत!
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
Lokstta editorial Simon Biles Simon Biles Paris Olympics 2024
अग्रलेख:जुगाडांच्या पलीकडे…
Loksatta editorial on badlapur protest against school girl sexual abuse case
अग्रलेख: आत्ताच्या आत्ता…
loksatta editorial Attack of the Ukrainian army inside the territory of Russia
अग्रलेख: ‘घर में घुसके’…
loksatta editorial analysis challenges before bangladesh interim pm mohammad yunus
अग्रलेख : ‘शहाणा’ मोहम्मद!
independence day 2024
अग्रलेख: स्वातंत्र्य… आपले आणि त्यांचे!
loksatta editorial on Hindenburg Sebi Row
अग्रलेख: संशयकल्लोळातून सुटका!

हेही वाचा : व्यक्तिवेध : शोभना रानडे

नंदीग्राममध्ये पोलिसांच्या गोळीबारात काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. विरोधाचा रेटा इतका प्रबळ होता की अखेर दोन्ही प्रकल्प रद्द करावे लागले. सिंगूर प्रकल्प गुजरातला गेला. नंदीग्रामचे रासायनिक हब नयाचार येथे हलवण्यात आले. सिंगूर आणि नंदीग्राम ही दोन्ही आंदोलने राज्याच्या राजकारणात आमूलाग्र बदल घडवण्यास कारणीभूत ठरली. या आंदोलनांमध्ये माओवाद्यांनी शिरकाव केल्याचे राज्य सरकारचे म्हणणे होते. पण या युक्तिवादाचा काही उपयोग झाला नाही. ३४ वर्षे सलग सत्ता राबवल्यानंतर २०११ मध्ये डाव्यांची सत्ता गेली ती गेलीच.

स्वातंत्र्यपूर्व काळात कोलकाता येथे १ मार्च १९४४ रोजी जन्म झालेले बुद्धदेव भट्टाचार्य यांनी शैलेंद्र सरकार विद्यालयातून शालेय आणि प्रतिष्ठित प्रेसिडेन्सी विद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले. महाविद्यालयीन जीवनात असतानाच त्यांची वैचारिक बैठक पक्की झाली होती. त्याबरोबरच त्यांना साहित्याचीही गोडी लागली. नंतरच्या काळात महत्त्वाचा कम्युनिस्ट नेता म्हणून वाटचाल करत असताना कविता, स्तंभलेखन आणि वक्तृत्वातील त्यांच्या कौशल्याचीही प्रशंसा होत असे.

हेही वाचा : व्यक्तिवेध: यामिनी कृष्णमूर्ती

१९६६ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश, १९७७ मध्ये कोसीपूर येथून विधानसभा निवडणुकीत विजयी, त्यानंतर १९८७ ते २०११ या कालखंडात जादवपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व अशी त्यांची राजकीय कारकीर्द! २००६ ते २०१५ पर्यंत ते पॉलिट ब्युरोचे सदस्य होते. पक्षाची विविध धोरणे आखण्यात त्यांचे योगदान होते. मुख्यमंत्री असताना पश्चिम बंगालची कृषीआधारित अर्थव्यवस्था औद्याोगिक वळणाकडे नेण्यासाठी त्यांनी धोरण आखले. त्याची अंमलबजावणी करत असतानाच त्यांना सत्ता सोडावी लागली. यानंतर राज्यातील माकप आणि अन्य डाव्या पक्षांची वेगाने दुरवस्था झाली. तरीही पक्षाच्या मूल्यांवरील त्यांची निष्ठा जराही ढळली नाही. २०२२ मध्ये मोदी सरकारने त्यांना पद्माभूषण पुरस्कार जाहीर केला. मात्र, तो स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. या पुरस्काराच्या आडून भाजप डाव्यांचा राजकीय वारसा स्वतकडे वळवू पाहत आहे, असा आरोप त्या वेळी झाला होता. स्वार्थ आणि संधिसाधूपणा यांनी सध्याचे राजकारण लडबडलेले असताना बुद्धदेव भट्टाचार्य यांच्यासारखे राजकारणी अधिकच उठून दिसतात.