15 October 2019

News Flash

‘आयसीसी’च्या विश्व इलेव्हन संघाच्या कर्णधारपदी विराट कोहली; आशिष नेहराचाही समावेश

विराट कोहली हा यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे.

ICC World XI : गेल्या दोन वर्षांत कोहलीच्या विविध इंनिंग्जने तो भारतीय फलंदाजीच्या सम्राटपदाचा अंगरखा परिधान करून, रत्नमाला घालून उभा आहे.

नुकत्याच झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील खेळाडुंच्या कामगिरीच्याआधारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेकडून (आयसीसी) ट्वेन्टी-२० प्रकारातील विश्व इलेव्हन संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाची ‘रनमशीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीला या संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. याशिवाय, विश्वचषकात भारतीय गोलंदाजीची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या आशिष नेहरालाही या संघात स्थान मिळाले आहे. विराट कोहली हा यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीने टी-२० विश्वचषकात खेळलेल्या पाच डावांमध्ये १३६.५०च्या सरासरीने २७३ धावा केल्या. विराट या स्पर्धेत तीन वेळा नाबाद राहिला. त्याचीच दखल घेत आयसीसीने विराटकडे या संघाचे नेतृत्त्व सोपवले आहे.

आयसीसीचा ट्वेन्टी-२० संघ पुढीलप्रमाणे:

जेसन रॉय (इंग्लंड)
क्वांटन डि कॉक (दक्षिण आफ्रिका)
विराट कोहली (कर्णधार) (भारत)
जो रूट (इंग्लंड)
जोस बटलर (इंग्लंड)
शेन वॉटसन (ऑस्ट्रेलिया)
आंद्रे रसेल (वेस्ट इंडिज)
मिचेल सँटनर (न्यूझीलंड)
डेव्हिड विली (इंग्लंड)
सॅम्युअल बद्री (वेस्ट इंडिज)
आशिष नेहरा (भारत)
एम रेहमान, बारावा खेळाडू (बांग्लादेश)

First Published on April 4, 2016 5:48 pm

Web Title: virat kohli named captain of icc world xi team of the tournament ashish nehra also named in the xi wt20