scorecardresearch

अरविंद केजरीवाल

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे आम आदमी पार्टीचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि केंद्रशासित प्रदेश दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. देशातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ (IAC) मोहिमेचे ते सदस्य होते.

२०१२ मध्ये आयएसी मोहिमेद्वारे जनलोकपाल विधेयक आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर त्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला. केजरीवाल यांनी आयआयटी खरगपूरमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं असून ते व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनियर आहेत. त्यांनी आयकर विभागाचे संयुक्त आयुक्त म्हणूनही काम केलं आहे.

परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी तळागाळातील लोकांसाठी केलेल्या सामाजिक कामासाठी त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. २०१२ मध्ये केजरीवाल पहिल्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले होते. परंतु त्यांच्या पक्षाला सभागृहात पूर्ण बहुमत नसल्याने जनलोकपाल विधेयक पारित करू शकलो नाही, असा दावा करत त्यांनी अवघ्या ४९ दिवसांत राजीनामा दिला. त्यानंतर २०१५ मध्ये आम आदमी पार्टीने दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६७ जागा जिंकत मोठा विजय संपादन केला.
Read More
Delhi Excise Policy Scam K Kavitha
के. कविता यांच्या अडचणीत वाढ, ‘आप’ नेत्यांशी १०० कोटींचा व्यवहार केल्याचा ईडीचा दावा

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरण, आमदार के. कविता यांना ईडीकडून अटक, आम आदमी पक्षाच्या नेत्यांशी के. कविता यांनी १०० कोटींचा आर्थिक…

arvinda kejriwal
ईडीच्या समन्सकडे केजरीवालांचे दुर्लक्ष

दिल्ली जल मंडळातील कथित अनियमिततांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या एका प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बजावलेल्या समन्सनुसार ईडीसमोर हजर होणे दिल्लीचे मुख्यमंत्री…

Satyendar Jain bail application rejected by Supreme Court
‘आप’चे नेते सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज फेटाळला, सर्वोच्च न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश

सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे सत्येंद्र जैन यांना आता पुन्हा तुरुंगात जावं लागण्याची शक्यता आहे.

Bhagwant Mann
भगवंत मान यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या कॉमेडियनला लोकसभेचं तिकीट; कोण आहे करमजीत अनमोल?

आम आदमी पार्टीच्या या यादीत एका अशा नावाचाही समावेश आहे, जे ऐकून राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे…

Arvind kejriwal on ED Summons and AAP slams Narendra Modi
‘पंतप्रधान मोदी लोकसभेआधी केजरीवालांना तुरुंगात टाकणार’, ईडीच्या नोटिशीनंतर ‘आप’चा आरोप

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात दिल्ली राऊस अव्हेन्यू न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आज पुन्हा त्यांना दोन…

Delhi Chief Minister Arvind Kejriwal granted bail
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर, दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात अटकेची होती भीती

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात दिल्ली राऊस अव्हेन्यू न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या आदेशानंतर मुख्यमंत्री अरविंद…

protest against caa in many states
‘सीएए’चा अनेक राज्यांत निषेध, मतांसाठीचे गलिच्छ राजकारण : केजरीवाल

केजरीवाल यांनी देशात राहणाऱ्या हिंदू, शीख, बौद्ध आणि ख्रिश्चन निर्वासितांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला.

arvind kejriwal narendra modi
“CAA मुळे आपल्या नोकऱ्या जाणार, घरं हिरावणार”, केजरीवालांच्या दाव्यावर भाजपाचा पलटवार, म्हणाले…

अरविंद केजरीवाल म्हणाले, “केंद्र सरकार नागरिकत्व सुधारणा विधेयकाची अंमलबजावणी करून आपल्या हक्काच्या घरात पाकिस्तानी लोकांना बसविण्याचे काम करत आहे.

CM Arvind Kejriwal On CAA
‘पाकिस्तानी लोकांना भाजपा नेते त्यांच्या घरी ठेवणार का?’, ‘सीएए’वरून अरविंद केजरीवालांचा निशाणा

केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा विधेयकाची (सीएए) अधिसूचना जारी केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारवर जोरदार टिका केली आहे.

rvind Kejriwal
“धर्मयुद्धात श्रीकृष्ण आमच्या बाजूने”, केजरीवालांनी हरियाणात फोडला प्रचाराचा नारळ; कुरुक्षेत्रमधून उमेदवाराची घोषणा

कुरुक्षेत्र मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने ‘बदलेंगे कुरुक्षेत्र, बदलेंगे हरियाणा. इब्बकै INDIA को जिताना’ असं घोषवाक्य…

CM Arvind Kejriwal On Women Voters
‘नवरा मोदी-मोदी म्हणत असेल तर जेवण देऊ नका’, अरविंद केजरीवालांचा महिलांना अजब सल्ला

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महिला मतदारांना एक अजब सल्ला दिला आहे. “नवरा मोदी-मोदी म्हणत असेल तर जेवण देऊ नका”,…

Delhi ram rajya budget
दिल्लीचा अर्थसंकल्प रामराज्य आणि रामायणाने प्रेरित; लोकसभा निवडणुकीत होणार फायदा?

लोकसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाने (आप) सादर केलेल्या या अर्थसंकल्पाला धार्मिक प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न आणि हिंदू मतदारांना आकर्षित करण्याचा…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×