भारत देश हा सध्या अनेक प्रोजेक्टवर काम करत आहेत. तसेच देशभरात सध्या अनेक टेलिकॉम कंपन्यांनी आपली ५ जी सर्व्हिस सुरु केली आहे. देशाच्या अनेक शहरांमध्ये ५जी नेटवर्क सुरु झाले आहे. सध्या नेटवर्क स्पीड टेस्ट साईट असणाऱ्या Ookla च्या नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टमध्ये भारतात ५ जी सर्व्हिस अत्यंत वेगाने पसरत असल्याचे समोर आले आहे. स्पीड टेस्ट ग्लोबल इंडेक्समध्ये भारताची स्थिती मजबूत होताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जानेवारी २०२३ मध्ये भारत हा ६९ व्या स्थानावर होता परंतु भारतात ५जी च्या वेगामुळे भारत ४९ व्या स्थानावर पोहोचला आहे. या आकडेवारीवरून भारत आता रशिया आणि अर्जेटिना सारख्या G20 राष्ट्रांच्याही पुढे गेला आहे. Reliance Jio आणि Airtel 5G यांच्या स्पीडची तुलना करताना Ookla ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जानेवारी २०२३ मध्ये jio ५जी सर्व्हिस वापरणाऱ्या वापरकर्त्यांना हिमाचल प्रदेशमध्ये २४६.४९ Mbps चा सरासरी डाउनलोड स्पीड मिळाला. तसेच तो कोलकात्यामध्ये ५०६.२५ Mbps इतका स्पीड नोंदवला गेला आहे. तर दुसरीकडे Airtel ५जी वापरकर्त्यांना सुरुवातीला कोलकाता येथे ७८.१३ Mbps आणि दिल्लीमध्ये २६८८९ Mbps डाउनलोड स्पीडचा आनंद घेतला.

हेही वाचा : Tesla News: एलॉन मस्क नव्हे तर, ‘हे’ आहेत टेस्लाचे खरे संस्थापक, जाणून घ्या सविस्तर

VI ला होतेय नुकसान

Ookla च्या रिपोर्टमध्ये हे ही समोर आले की, टेलिकॉम कंपनी असणाऱ्या VI म्हणजेच वोडाफोन-आयडियाचे २०२२या वर्षांमध्ये वापरकर्त्यांची संख्या सातत्याने कमी झाली आहे. ५ जी सर्व्हिस सुरु झाल्यानंतर वापरकर्ते मोठ्या प्रमाणात VI सर्व्हिसकडे दुर्लक्ष करत आहेत. मोबाईल स्पीडच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास भारत ५जी बाबतीत रशिया, अर्जेटिना, मेक्सिको, श्रीलंक , बांगलादेश, पाकिस्तान आणि इंडोनेशिया या देशांच्या पुढे गेला आहे. Ookla ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील डाउनलोड स्पीड गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये १३.८७ Mbps वरून ११५ टक्क्यांनी वाढून या वर्षी जानेवारीमध्ये २९.८५ Mbps इतका झाला आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5g mobile deta speed in india rise by 115 g20 countries jio airtel and vodafone idea tmb 01
First published on: 01-03-2023 at 17:03 IST