Airtel 5g Is Live hers How to Activate It and Everything Else to Know Tech Tips | Loksatta

5G Launch In India: एअरटेल वापरकर्ते ‘या’ पद्धतीने घेऊ शकतात 5G सेवेचा आनंद; जाणून घ्या टिप्स…

१ ऑक्टोबर २०२२ रोजी उद्घाटन कार्यक्रमादरम्यान भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी एअरटेलच्या 5जी सेवेची घोषणा केली. मात्र, ही एअरटेलची 5G सेवा वापरायची कशी हे आज आपण जाणून घेणार आहोत.

5G Launch In India: एअरटेल वापरकर्ते ‘या’ पद्धतीने घेऊ शकतात 5G सेवेचा आनंद; जाणून घ्या टिप्स…
Photo-financialexpress

दूरसंचार ऑपरेटर भारती एअरटेलने भारतात 5G सेवा सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेला सुरुवात करण्यात आली असून ही सेवा सुरू झाल्यानंतर एअरटेलने जीओवर मात करीत देशातील आठ शहरात आपली 5G सेवा सुरू केली आहे. १ ऑक्टोबर २०२२ रोजी उद्घाटन कार्यक्रमादरम्यान भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी एअरटेलच्या 5जी सेवेची घोषणा केली. मात्र, ही एअरटेलची 5G सेवा वापरायची कशी हे आज आपण जाणून घेऊया.

एअरटेलची 5G सेवा १ ऑक्टोबरपासून दिल्ली, वाराणसी, बेंगळुरू, हैदराबाद, मुंबई, चेन्नई, नागपूर आणि सिलीगुडी येथे सुरू झाली आहे. मात्र, कंपनीने अद्याप नेमके ठिकाण किंवा सर्कल कोठे 5G सेवा सुरू केली आहे याबद्दल माहिती दिलेली नाही.

एअरटेल 5G असे तपासा

Airtel वापरकर्ते त्यांच्या 5G स्मार्टफोन्सवर Airtel Thanks अॅपच्या मदतीने त्यांच्या आसपास 5G नेटवर्कची उपलब्धता तपासू शकतात.

आणखी वाचा : अरे वा! जीओच्या क्लाउड गेमिंग तंत्रज्ञानामुळे, एंट्री लेव्हल 5G मोबाईलसह गेमर आता हाय-एंड गेम खेळण्याचा आनंद घेऊ शकणार; जाणून घ्या सविस्तर

5G वापरण्यासाठी काय आवश्यक असेल

5G नेटवर्क : 5G सेवा वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या क्षेत्रात 5G नेटवर्कची आवश्यकता असेल. एअरटेलने आधीच सांगितले आहे की सध्या त्यांची 5G सेवा फक्त काही ठिकाणी उपलब्ध आहे जिथे त्यांचे 5G टॉवर स्थापित आहेत.

5G स्मार्टफोन : 5G सेवा वापरण्यासाठी तुम्हाला 5G सुसंगत स्मार्टफोनची आवश्यकता असेल.

एअरटेल 5G सेवा या पद्धतीने करा सक्रिय

एअरटेलने पुष्टी केली आहे की त्यांचे विद्यमान 4G सिम 5G तयार आहे. या प्रकरणात, 5G सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला नवीन सिमची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून 5G सक्रिय करू शकता.

१. 5G सक्रिय करण्यासाठी, फोनच्या सेटिंग्ज अॅपवर जा.
२. येथे तुम्हाला कनेक्शन्स किंवा मोबाईल नेटवर्क पर्याय दिसेल.
३. या पर्यायावर जाऊन, तुम्हाला 5G/4G/3G/2G म्हणून नेटवर्क मोड निवडण्याचा पर्याय दिसेल.
४. 5G निवडून, तुम्ही आपोआप 5G सुरू कराल. तुमच्या परिसरात एअरटेलचे 5G नेटवर्क असल्यास, तुम्हाला 5G लोगो दिसेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अरे वा! जीओच्या क्लाउड गेमिंग तंत्रज्ञानामुळे, एंट्री लेव्हल 5G मोबाईलसह गेमर आता हाय-एंड गेम खेळण्याचा आनंद घेऊ शकणार; जाणून घ्या सविस्तर

संबंधित बातम्या

सादर झाला INFINIX ZERO 5G 2023; 8 जीबी रॅम, ५० एमपी कॅमेरासह अनेक फीचर्स, जाणून घ्या किंमत
REALME 10 PRO + फोनची किंमत पाहून रेडमीलाही फुटणार घाम; फास्ट चार्जिंग, १०८ एमपी कॅमेरासह मिळतंय बरेच काही
७ हजारांच्या आत मिळवा ‘हा’ ३२ इंच टीव्ही, अमेझॉनवर मिळत आहे मोठी सूट
सॅमसंग, असूसला फुटणार घाम; ९६ जीबी रॅमसह लाँच होऊ शकतो ‘हा’ लॅपटॉप
तुमच्या मोबाईलची स्क्रीन बर्न-इन होत आहे का? ‘या’ सोप्या युक्त्यांद्वारे सहज ही समस्या सोडवता येईल

व्हिडिओ

ताज्या बातम्या
म्हैसाळ योजनेवरून भाजपाच्या माजी आमदाराचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, “दुष्काळी जनतेची दिशाभूल…”
वऱ्हाडासाठी बुक केले संपूर्ण विमान; Viral Video ने जिंकली नेटकऱ्यांची मनं
VIDEO:’फोटो क्या ले रहे हो यार’, रोहित शर्मा आधी फोटोग्राफरवर रागावला, नंतर स्वत:च फोटोसाठी दिली पोज
मानसिक आरोग्य सेवा कायद्याच्या उद्दीष्टांची अंमलबजावणी: राज्य सरकार, राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणाच्या कारभारावर न्यायालयाचे ताशेरे
नादच केला पठ्ठ्यानं! चक्क किंग कोब्रालाच घातली आंघोळ, श्वास रोखून धरणारा असा Viral Video यापूर्वी पाहिला नसेल?