Android 16 Release Date : जर तुम्हीही अँड्रॉईड मोबाइल वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण अँड्रॉईड १६ चे स्टेबल व्हर्जन लवकरच रिलीज होत आहे, ज्यामुळे अनेकांना त्यांच्या स्मार्टफोनमध्ये अपडेटेड व्हर्जन वापरता येणार आहे. गूगल पुढील महिन्यात म्हणजेच जूनमध्ये अँड्रॉइड १६ चे स्टेबल व्हर्जन रिलीज करणार आहे. अँड्रॉइड शोनंतर गूगलने याची पुष्टी केली आहे.
कंपनी लवकरच सॉफ्टवेअरचा बीटा रन बंद करेल, जेणेकरून त्यांना अँड्रॉईड १६ चे स्टेबल व्हर्जन रिलीज करता येईल. पण, गूगलने जून २०२५ मध्ये अँड्रॉईड १६ चे स्टेबल व्हर्जन लाँच केल्यानंतर कोणत्या स्मार्टफोनमध्ये ते वापरता येईल याची एक संभाव्य लिस्ट समोर आली आहे.
या स्मार्टफोन्समध्ये वापरता येणार अँड्राईड १६ अपडेट (Android 16 Release: Which Phones Might Get It First )
पिक्सेल ६ (Pixel 6)
पिक्सेल ६ (प्रो Pixel 6 Pro)
पिक्सेल ६ए (Pixel 6a)
पिक्सेल ७ (Pixel 7)
पिक्सेल ७ प्रो (Pixel 7 Pro)
पिक्सेल ७ए (Pixel 7a)
पिक्सेल ८ (Pixel 8)
पिक्सेल ८ प्रो (Pixel 8 Pro)
पिक्सेल ८ए (Pixel 8a)
पिक्सेल फोल्ड (Pixel Fold)
पिक्सेल ९ (Pixel 9)
पिक्सेल ९ प्रो (Pixel 9 Pro)
पिक्सेल ९ प्रो एक्सएल (Pixel 9 Pro XL)
पिक्सेल ९ प्रो फोल्ड (Pixel 9 Pro Fold)
पिक्सेल ९ए (Pixel 9a)
सॅमसंग स्मार्टफोनमध्येही मिळतील नवीन अपडेट
गूगलच्या स्वतःच्या स्मार्टफोन व्यतिरिक्त अनेक सॅमसंग गॅलेक्सी डिव्हाइसेसमध्येही अँड्रॉइड १६ अपडेट मिळण्याची शक्यता आहे. यात पहिल्यांदा गॅलेक्सी S25 सीरिजमध्ये हे अपडेट वापरता येऊ शकते, ज्यामध्ये S25, S25 Plus, S25 Ultra आणि S25 Edge यांचा समावेश आहे. यासह Galaxy Z Fold 6 आणि Galaxy Z Flip 6 यात समावेश आहे.
याशिवाय सॅमसंगने ठरवलेल्या टाईमटेबलनुसार, नव्या काही सीरिज लाँच केल्या तर सॅमसंगच्या फोल्डेबल, Galaxy Z Fold 7 आणि Z Flip 7 या डिव्हाईजमध्येही जुलैपासून वन यूआय १६ सह अँड्रॉईड १६ हे स्टेबल व्हर्जन युजर्सना वापरता येईल.
विशेषतः वन यूआय 7 रोलआउटमध्ये अडथळे आल्यानंतर Galaxy S24 सीरिज (S24, S24 Plus आणि S24 Ultra) युजर्सना या वर्षाच्या चौथ्या तिमाहीत अँड्रॉइड 16 अपडेट मिळू शकेल.