भारतात सध्या अनेक इंटरनेट सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्या आहेत. यापैकी आघाडीची कंपनी म्हणून प्रसिद्ध रिलायन्स जीओ फायबर आहे. जीओ फायबर फार कमी वेळात भारतात लोकप्रिय झाले आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन प्लॅन सादर करत असते. अनेक महिन्यांपासून जीओ फायबर ग्राहकांना पोस्टपेड तसेच प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहे. अशातच जीओने एक भन्नाट ऑफर आणली आहे. या ऑफरमुळे तुम्हाला एकही रुपया न भरता जीओ फायबर कनेक्शन बुक करता येणार आहे. ही ऑफर २८ ऑक्टोबर २०२२ पर्यंत वैध असेल. चला तर जाणून घेऊया ही ऑफर…

काय आहे ऑफर ?

जीओ फायबर पोस्टपेड प्लॅन्स ४९९ रुपये प्रति महिना पासून सुरू होतील आणि शून्य बुकिंग खर्चासह येतील. ग्राहकांना ३, ६ किंवा १२ महिन्यांसाठी पोस्टपेड योजना निवडावी लागेल. यामुळे त्यांना इन्स्टॉलेशनसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत आणि राउटरसाठी शून्य अनामत शुल्क देखील भरावे लागणार आहे. जीओ फायबर पोस्टपेड प्लॅन्सची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते ओटीटी फायद्यांसह येतात.

आणखी वाचा : मस्तच! ७५ हजारांचा सॅमसंगचा ‘हा’ स्मार्टफोन फक्त १५,७५० रुपयांत, जाणून घ्या ऑफर

जे ग्राहक जीओ फायबर पोस्टपेड प्लॅनसह ओटीटी फायद्यांसाठी दरमहा अतिरिक्त १०० रुपये किंवा २०० रुपये भरत आहेत ते कंपनीकडून जीओ सेट-टॉप बॉक्स मोफत मिळवण्यास पात्र आहेत. तुम्ही जीओ फायबर पोस्टपेड कनेक्शनसह ३० Mbps स्पीड ते १ Gbps पर्यंतच्या योजना मिळवू शकता

सध्या, जीओ फायबर सणासुदीच्या हंगामासाठी प्रमोशनल ऑफर देखील चालवत आहे. जे ग्राहक ५९९ रुपये प्रति महिना किंवा ८९९ रुपये प्रति महिना प्लॅन ६ महिन्यांसाठी घेतात त्यांना कंपनीकडून १५ दिवसांच्या अतिरिक्त सेवेसह १०० टक्के मूल्य परत मिळेल. प्लॅनचे १०० टक्के मूल्य ग्राहकांना Ajio, Reliance Digital, Netmeds आणि Ixigo च्या कूपनसह परत दिले जाते.

जीओ फायबरवर कनेक्शन बुक कसे करावे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जीओ फायबर वर कनेक्शन बुक करण्यासाठी, तुम्ही कंपनीच्या कस्टमर केअरला कॉल करू शकता, जवळच्या रिटेल स्टोअरला भेट देऊ शकता किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन विनंती करू शकता.