scorecardresearch

IRCTC वरून प्रत्येकवेळी बुक करता येणार कन्फर्म तिकीट; फक्त फॉलो करा ‘या’ ट्रिक्स

आज आपण एक अशी ट्रिक जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने तिकीट बुक करणे आणखीनच सोपे होणार आहे.

irctc ticket booking
ही ट्रिक काय आहे आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे हे जाणून घेऊया. (File Photo)

भारतात रेल्वे तिकीट बुक करणे फारच कठीण आहे. कारण तिकीट बुक करायला जराही उशीर झाला तर आरक्षण मिळत नाही. अशावेळी आपल्याला तात्काळ तिकिटांवर अवलंबून राहावे लागते. पण आता या समस्येवर एक उपाय आहे. आज आपण एक अशी ट्रिक जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने तिकीट बुक करणे आणखीनच सोपे होणार आहे.

तिकीट बुक करण्याआधी आपल्याला काही गोष्टीं लक्षात घ्याव्या लागणार आहेत. ही ट्रिक काय आहे आणि यावेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे हे जाणून घेऊया.

  • लवकर तिकीट बुक करण्याच्या गडबडीत, आपण जिथे आहोत तिथे इंटरनेटचा स्पीड चांगला आहे की नाही हे पाहायला आपण विसरतो. त्यामुळे सर्वप्रथम तुमच्या डिव्हाइसचा इंटरनेट स्पीड चांगला आहे का ते तपासा.
  • तत्काळ तिकिटे बुक करण्यासाठी, योग्य वेळी ऑनलाइन असणे आवश्यक आहे. एसी तत्काळ तिकीट बुकिंगची वेळ सकाळी १० आहे, त्यामुळे तुम्ही ९ वाजून ५८ मिनिटांपर्यंत लॉग इन केले पाहिजे.
  • स्लीपर क्लासमध्ये तत्काळ तिकिटांची बुकिंगची वेळ सकाळी ११ वाजता आहे. अशा परिस्थितीत, १० वाजून ५८ मिनिटांपर्यंतलॉग इन करा. लॉगिन केल्यानंतर लगेच काउंटर उघडण्यापूर्वी तुम्ही मास्टर लिस्ट तयार करावी.

वेबसाइट खरी आहे की बनावट हे ओळखणे झाले सोपे; मिनिटांमध्ये कळणार सत्यता

मास्टर शीट काय आहे, हे जाणून घेऊया.

जेव्हा तुम्ही तत्काळ तिकीट बुक करायला बसता तेव्हा फक्त मर्यादित जागा असतात. त्यात आपली स्वतःसाठी जागा मिळवण्यासाठी आपल्याला आपले काही वैयक्तिक तपशील भरावे करावे लागतात. त्यात आधार कार्ड क्रमांक टाकावा लागतो. ही माहिती भरण्यात एवढा वेळ जातो की तिकिटे आधीच बुक झालेली असतात. अशा परिस्थितीत, मास्टर लिस्ट तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.

जर तुम्ही मास्टर लिस्टमध्ये तुमचे आवश्यक तपशील आधीच टाकले असतील, तर तुम्हाला तिकीट बुक करताना काहीही करण्याची गरज नाही. तुम्ही नावावर क्लिक करताच, तुमचे जारी केलेले तपशील खाली येतील. त्यावर क्लिक केल्यावर तपशील आपोआप भरला जाईल आणि तुमचा वेळ वाचेल.

मोबाईल चोरीला गेल्यावर बँक डिटेल्स आणि मोबाईल वॉलेटचे संरक्षण कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर माहिती

मास्टर लिस्टमध्ये तपशील कसे जोडायचे?

आयआरसीटीसी वेबसाइटवरील ‘माय प्रोफाइल’ विभागात एक मास्टर लिस्ट तयार करा. नाव, वय, ओळखपत्राचा प्रकार, भोजन आणि बर्थ प्राधान्य यांसारख्या तपशीलांसह सर्व प्रवाशांच्या तपशीलांसह एक यादी तयार करा.

तुम्ही युपीआय, आयआरसीटीसी वॉलेट किंवा इतर कोणतीही पेमेंट पद्धत वापरत असलात, तरीही तुमच्याकडे त्वरीत पैसे हस्तांतरित करण्यासाठी आणि तुमचे तिकीट बुक करण्यासाठी पुरेसे पैसे असल्याची खात्री करा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Confirm tickets can be booked from irctc at any time just follow these tricks pvp