ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो ग्राहकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही झोमॅटो ॲपवर ऑर्डर केलेला पदार्थ तुमच्यापर्यंत सुखरूप पोहचवण्याचे काम कंपनीचा डिलिव्हरी बॉय करतो. उन्हाळा, पाऊस, थंडी असो कशाचीही पर्वा न करता, चेहऱ्यावर हास्य ठेवून डिलिव्हरी बॉय घरोघरी प्रत्येकाचे पदार्थ सुखरूप पोहचवतात. तर आज याच डिलिव्हरी पार्टनर्ससाठी (डिलिव्हरी बॉय) कंपनीने खास पाऊल उचलले आहे.

फूड डिलिव्हरी ॲप झोमॅटोने नवी दिल्लीत एक खास घोषणा केली आहे. झोमॅटो त्यांच्या तीन लाखांपेक्षा अधिक डिलिव्हरी पार्टनर्सना ब्ल्यूटूथ हेल्मेट वितरित करणार आहे. तसेच गेल्या महिन्यापर्यंत दहा हजार डिलिव्हरी पार्टनर्सना प्रथमोपचार, सीपीआरसह आपत्कालीन परिस्थितीत कश्या प्रकारे मदत करायची याचे प्रशिक्षण दिले आहे. दिल्लीतील एका खास कार्यक्रमात डिलिव्हरी पार्टनर्ससाठी ब्ल्यूटूथ सक्षम हेल्मेट देऊन त्यांच्या कल्याण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने झोमॅटोने एक अनोखं पाऊल उचललं आहे. डिलिव्हरी पार्टनर्स आणि सेवा देणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठीसुद्धा हे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा…Washing Machine Tips : काही मिनिटांत स्वच्छ होईल वॉशिंग मशीन; ‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो….

एआय-संचालित प्रणाली, हेल्मेट वेअर डिटेक्शन, चिन-स्ट्रॅप लॉक मॉनिटरिंग आणि गैर-अनुपालनासाठी प्रीसेट कंडिशनल मर्यादा या फीचर्ससह अत्याधुनिक कार्यक्षमता या हेल्मेटमध्ये आहे. हेल्मेट सक्रिय करण्यासाठी डिलिव्हरी पार्टनर्सनी ते चालू करून ब्ल्यूटूथ ॲप्लिकेशनशी लिंक करावे आणि मग वापरावे. या ब्ल्यूटूथ हेल्मेटमध्ये प्रगत सेन्सर तंत्रज्ञान एम्बेड केलेलं आहे. तसेच हेल्मेट हनुवटीच्या इथे लावल्या जाणाऱ्या पट्ट्याच्या सुरक्षित फास्टनिंगची पुष्टी करते. हेल्मेटचे हे सेटअप सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवाय २०२३ वर्षाच्या अखेरच्या दिवसात कंपनीने डिलिव्हरी भागीदारांना दोन लाख ५० हजारपेक्षा जास्त वेअरेबल मालमत्ता (असेट्स) वितरित केल्याचा दावा केला होता. या असेट्समध्ये रात्री डिलिव्हरीदरम्यान व्हिजीबिलीटी वाढविण्यासाठी एक पट्ट्यांच जॅकेटसुद्धा देणार आहे. तसेच झोमॅटोने महिला डिलिव्हरी पार्टनर्ससाठी एक विस्तृत ‘मातृत्व विमा योजना’देखील सुरू केली आहे. ज्यामध्ये गर्भधारणेशी संबंधित खर्च म्हणजेच बाळंतपणाचा खर्च समाविष्ट असेल.