How William Shakespeare Played A Role In Google's Creation: कोणता सण कधी आहे, फोटोसाठी कॅप्शन ते ऑफिसचे काम, शाळेचा अभ्यास करताना पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण आता सर्च इंजिन गूगलवर अवलंबून असतो. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का गूगल कसे, कोणी व का तयार केले असेल? नाही… तर नुकतेच याचे गुपित अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सन यांनी उघड केले आहे. अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सन यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर केली. त्यात एक प्रश्न व भलेमोठे उत्तर होते. तर हा प्रश्न असा होता की, तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रेरणा कुठून मिळाली? याबद्दल सांगताना त्यांनी लिहिले की, जगातील सर्वांत मोठ्या कंपनीच्या म्हणजेच गूगलच्या स्थापनेत शेक्सपियरची मोठी भूमिका होती, असे गूगलचे सह-संस्थापक सर्गे ब्रिन यांनी रिचर्ड ब्रॅन्सन यांना सांगितले होते आणि ही गोष्ट ते कधीच विसरणारसुद्धा नाहीत, असेही त्यांनी नमूद केले आहे. हेही वाचा…Jio AirFiber: जिओ एअरफायबरवर मिळतेय १००० रुपयांची सूट; केबलशिवाय हाय स्पीड डेटा मिळेल; कोणासाठी असणार ही ऑफर? जाणून घ्या अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सन यांनी पुढे म्हटले की, या संवादाच्या वेळी दोघेही व्हर्जिन व्हॉयेज क्रूझवर होते. त्या काळात आस्क जीव्स (Ask Jeeves) हे इंटरनेटचे सर्च इंजिन होते. येथे सर्च करण्याव्यतिरिक्त लोकांना त्यांच्या प्रश्नांना अचूक शब्दबद्ध प्रश्न म्हणून फ्रेम करावे लागायचे. जीव्स हे सर्च इंजिन एक जुन्या पद्धतीचा बटलर म्हणून काम करायचे ; असे त्यांनी सांगितले. जगप्रसिद्ध ब्रिटिश नाटककार विल्यम शेक्सपियर यांनी डेन्मार्कचा राजकुमार हॅम्लेट याच्या आयुष्यातील दुःखद घटनांवर एक काल्पनिक शोकांतिका लिहिली होती. त्या शोकांतिकेचेनाव 'हॅम्लेट ' असे होते. या नाटकात त्यांनी म्हटलेला, टू बी, ऑर नॉट टू बी हा डायलॉग होता. हे पाहता, गूगलचे सह-संस्थापक सर्गे ब्रिनने यांनी 'आस्क जीव्स'वर 'टू बी ऑर नॉट टू बी' शोधण्याचा निर्णय घेतला. सेर्गे ब्रिन काय शोधत आहे हे पाहण्यासाठी 'जीव्स'देखील धडपडत होते आणि हीच गोष्ट सर्जे व लॅरी पेज यांना गूगल (Google) तयार करण्याच्या प्रेरणेचा भाग ठरली. त्यांना अशी एक साईट आणायची होती; जी सगळे सर्च टर्म कव्हर करू शकेल. मग तुम्ही तिथे कोणताही कीवर्ड टाकला तरीही… मग लॅरी पेज व सर्गे ब्रिन या संशोधकांनी गूगलची निर्मिती केली. ४ सप्टेंबर रोजी टायटॅनिक या जहाजाचे ७३ सालापूर्वीचे फोटो सापडल्यामुळे गूगल पहिल्यांदा जगासमोर आले होते. जेव्हा अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सन लॅरीबरोबर स्टेजवर उभे होते. तेव्हाचा एक क्षण सांगत ते म्हणाले की, मी तेव्हा ४०० पेक्षा जास्त कंपन्या स्थापन केल्या होत्या, तर त्यांनी फक्त एकच गूगल ही कंपनी स्थापन केली होती. त्यामुळे शेक्सपियर माझ्यासाठी प्रेरणास्रोत आहेत. निराशेच्या भावनेचे व्यावसायिक कल्पनेत रूपांतर करण्याची प्रक्रिया; ज्याचा कोणीही कधीही विचार केला नसेल, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.