तरुणाईमध्ये इन्स्टाग्राम सोशल मीडिया अ‍ॅपच प्रचंड वेड आहे. तासंतास तरूण या मोबाईल अ‍ॅपवर गुंतलेले असतात. फोटो शेअरिंगपासून रील्स बनवण्यावर भर असतो. रील्समध्ये तरुणांची आवड लक्षात घेत इन्स्टाग्रामने दोन फीचर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. यात टेक्स्ट टू स्पीच आणि व्हॉइस इफेक्टचा समावेश आहे. टेक्स्ट टू स्पीचमध्ये वापरकर्त्यांना आपला आवाज वापरता येणार आहे. तसेच व्हॉइस इफेक्टही असणार आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना वेगवेगळ्या आवाजात मजेशीर व्हिडिओ तयार करता येणार आहेत.

“आम्हाला माहित आहे की, व्हॉइस आणि ऑडिओ वापरणे ही रील बनवण्याच्या सर्वात मजेदार पैलूंपैकी एक आहे. म्हणूनच आम्ही ‘व्हॉइस इफेक्ट्स’ आणि ‘टेक्स्ट टू स्पीच’ ही दोन नवीन ऑडिओ टूल्स लॉन्च करत आहोत. हे दोन्ही फिचर्स आता iOS आणि Android वर Instagram वापरकर्त्यांसाठी आणले जात आहे. स्पीच पर्यायामध्ये नवीन मजकूर जोडण्यासाठी, एकदा तुम्ही क्लिपमध्ये मजकूर जोडल्यानंतर, स्क्रीनच्या तळाशी असलेल्या मजकूर बबलवर टॅप करा, त्यानंतर मेनूमधून टेक्स्ट-टू-स्पीच निवडावं लागेल.”, असं फर्मकडून सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे, टेक अ ब्रेक नावाच्या नवीन फिचर्सची चाचणी सुरू केली आहे जेणेकरुन लोकांना अ‍ॅप वापरण्यापासून नियमित ब्रेक घेण्यास मदत होईल आणि वापरकर्त्यांना त्यात व्यस्त राहण्यास प्रोत्साहित केले जाईल. इंस्टाग्रामचे प्रमुख अ‍ॅडम मोसेरी यांच्या म्हणण्यानुसार, दीर्घकाळापासून मागणी केलेले टेक अ ब्रेक फीचर वापरकर्त्यांना आठवण करून देईल की त्यांनी प्लॅटफॉर्मवर बराच वेळ घालवला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इन्स्टाग्राम मुलांसाठी हानिकारक असल्याची टीका होत असताना नवीन फिचर्स आलं आहे. अलीकडे, अमेरिकन व्हिसलब्लोअर फ्रान्सिस हौहानने उघड केले की लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप्स मुलांच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम करू शकतात.