Lava Agni 5G कंपनीने सुरू केली खास सेवा, घरबसल्या मिळणार फ्री सर्व्हिस

लावा इंटरनॅशनल लिमिटेडने अग्नि 5G स्मार्टफोन युजर्ससाठी ‘लावा अग्नि मित्र’ ही अनोखी ग्राहक सेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे.

Lava_Agni_Service
Lava Agni 5G कंपनीने सुरू केली खास सेवा, घरबसल्या मिळणार फ्री सर्व्हिस (Photo- Lava Mobile Twitter)

स्मार्ट फोन निर्मिती कंपन्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. मोबाईल फिचर्सपासून ते सर्व्हिसपर्यंत ग्राहकांना खूश करण्याचा सर्वच कंपन्यांचा प्रयत्न आहे. कंपनीचा फोन घेतल्यानंतर ग्राहकाला सर्व्हिस देण्यासाठी कंपन्या पुढाकार घेत आहेत. आता भारतीय स्मार्टफोन ब्रँड लावा इंटरनॅशनल लिमिटेडने लावा अग्नि 5G स्मार्टफोन युजर्ससाठी ‘लावा अग्नि मित्र’ ही अनोखी ग्राहक सेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. पहिल्यांदाच एकाच फोनसाठी स्वतंत्र कस्टमर केअर मॅनेजरची नियुक्ती करण्यात आली आहे. लावाच्या नवीन लॉन्च झालेल्या पहिल्या भारतीय 5G स्मार्टफोन युजर्ससाठी ही सेवा असेल.

Lava Agni 5G युजर्स घरबसल्या या सेवांचा लाभ घेऊ शकतील. ज्यामध्ये लावाचे सेवा प्रतिनिधी ग्राहकांच्या नोंदणीकृत पत्त्यावरून फोन घेतील आणि विहित सेवा विनामूल्य प्रदान केल्यानंतर उत्पादन त्यांच्या घरी पुन्हा देतील. जर ग्राहकाला लावाच्या ८०० हून अधिक सेवा केंद्रांपैकी कोणत्याही एका सेवा केंद्राला भेट द्यायची असेल, तर अग्नी 5G फोन युजर्संना प्राधान्य दिले जाईल. त्याचबरोबर कस्टमर केअर कॉलवर प्रतीक्षा वेळ शून्य असेल आणि डिव्हाइसशी संबंधित प्रत्येक समस्या त्वरित सोडवली जाईल.

“लावा अग्नी 5G फीचर्स आणि कामगिरीच्या बाबतीत स्पर्धेत आघाडीवर आहे. यामुळे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक स्मार्टफोन बनवण्याची भारताची क्षमता सिद्ध झाली आहे. इतकंच नाही तर आम्ही अग्नी युजर्ससाठी विक्रीनंतरच्या सेवांमध्ये नवीन बेंचमार्क सेट करू इच्छितो. लावा अग्नि मित्र आणि लावाची ८०० हून अधिक सेवा केंद्रांमध्ये प्राथमिकता असेल.’, असं लावा इंटरनॅशनल लिमिटेडचे प्रमुख सत्य सती यांनी सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Lava start free of cost doorstep services for agni 5g customer rmt

Next Story
Redmi Note 11T 5G भारतात ३० नोव्हेंबरला होणार लॉन्च; फिचर्स वाचून तुम्हालाही वाटेल…Redmi_Phone
ताज्या बातम्या