मेटा व्हेरिफाइड लॉन्च झाल्यापासून चांगलेच चर्चेत आहे. आता मेटा व्हेरिफाइडची भारतातसुद्धा नव्याने चर्चा सुरू आहे कारण आता लवकरच भारतात मेटा व्हेरिफाइड येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मेटा यूजर्ससाठी ही आनंदाची बातमी आहे.

मेटा व्हेरिफाइड काय आहे?

मेटा व्हेरिफाइड ही एक सेवा आहे ज्याद्वारे मेटामध्ये समावेश असलेल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल प्लॅटफॉर्मच्या यूजर्सला त्यांची ओळख व्हेरिफाय करून मिळणार पण ही सर्व्हिस ट्विटरपेक्षा वेगळी आहे.

हेही वाचा : इन्स्टाग्रामने स्टोरी आयकॉनची साइज वाढवली, युजर्स मात्र संतापले; तुमच्या इन्स्टाग्रामवरही दिसतो का हा बदल?

कशी असणार ही सेवा?

भारतात iOS आणि Android वर यूजर्सला व्हेरिफिकेशनसाठी प्रत्येकी महिना ६९९ रुपये भरावे लागतील. त्यानंतर पुढील महिन्यापासून यूजर्स वेबवरुनही व्हेरिफाय करू शकणार. या सेवेत यूजर्सला याशिवाय व्हेरिफाइड बॅज, फसवणूकीपासून सुरक्षा आणि अकाउंट सपोर्ट मिळणार.

मेटाने एका स्टेटमेंटमध्ये सांगितले होते की ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडमध्ये सुरवातीच्या टेस्टींगनंतर त्यांनी काही प्लॅनिंग केली. यानुसार वाढलेल्या रिचला काढून टाकण्याचा विचार आहे. हे आता भारतातही लागू होणार आहे.

हेही वाचा : Google ने रोलआऊट केले ‘हे’ फिचर; आता फिंगरप्रिंट, फेसअनलॉकच्या मदतीने करता येणार साइन इन, जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेटा व्हेरिफाइड कसे मिळवायचे?

मेटा अकाउंटवर तुम्हाला प्राथमिक माहिती द्यावी लागेल.
अर्ज करणाऱ्याचे वय १८ वर्ष असावे.
यूजरला व्हेरिफिकेशनसाठी सुरवातील प्रोफाइल निवडावी लागेल आणि पैसे भरावे लागतील.
यूजर्सला सरकारी आयडी द्यावी लागेल. ही आयडी तुमच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम अकाउंटच्या प्रोफाइला मॅच करणारी असावी.
जर तुमचे व्हेरिफिकेश नाकारले तर तुम्हाला पैसे परत मिळतील.