OnePlus च्या दोन नवीन स्मार्ट टीव्ही OnePlus TV Y1S आणि OnePlus TV Y1S Edge भारतात येत्या १७ फेब्रूवारीला लाँच करणार आहेत. वापरकर्त्यांना परवडणाऱ्या श्रेणीत कनेक्टेड इकोसिस्टम अनुभव देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून डिझाईन करण्यात आलेल्या या दोन स्मार्ट टीव्हीच्या लॉंचीग डेटपूर्वीच स्पेसिफिकेशन लीक झाले आहेत. वन प्लस कंपनीने अलीकडेच OnePlus TV Y1S आणि OnePlus TV Y1S Edge स्मार्ट टिव्ही लाँचला त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट आणि ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर टीज केलं आहे. अधिकृत घोषणेपूर्वीच या दोन नवीन टीव्ही सीरीजशी संबंधित इतर माहिती समोर आली आहे. OnePlus TV Y1S आणि OnePlus TV Y1S Edge मध्ये ३२ इंच आणि ४३ इंच आकाराचे डिस्प्ले मिळू शकतं. TV Y1S ची विक्री ऑनलाइन केली जाऊ शकते, तर OnePlus TV Y1S Edge ची विक्री ऑफलाइन चॅनेलद्वारे केली जाऊ शकते. OnePlus TV Y1S बद्दल याची खात्री केली गेली आहे की ते Android 11 वर काम करेल आणि ती Gamma Engine ने सुसज्ज असेल. आणखी वाचा : Tinder वर आता ३० ते ४९ वयोगटातील लोकांसाठी चार्ज कमी होणार अभिषेक यादव (@yabhishekd) यांनी ट्विट करून OnePlus TV Y1S आणि OnePlus TV Y1S Edge Smart TV बद्दल माहिती दिली आहे. टिपस्टरच्या मते, कंपनी या नवीन OnePlus स्मार्ट टीव्ही रेंजमध्ये चार स्मार्ट टीव्ही लॉंच करेल. OnePlus TV Y1S Edge बद्दल सांगितले जात आहे की याला ३२ इंच आणि ४३ इंच इतक्या आकाराची स्क्रीन देखील मिळेल. पण, त्याची विक्री ऑफलाइन माध्यमातून केली जाऊ शकते. OnePlus TV Y1S, OnePlus TV Y1S Edge स्पेसिफिकेशन (अपेक्षित)OnePlus Y1s श्रेणीतील स्मार्ट टीव्ही Android TV 11 वर चालतील. यामध्ये चार मॉडेल्स दिले जाऊ शकतात, ज्यामध्ये १ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. टिपस्टरनुसार, स्मार्ट टीव्ही MT9216 प्रोसेसरसह, ग्राफिक्ससाठी Mali-G31 MP2 GPU सह सुसज्ज असतील. नवीन स्मार्ट टीव्हीबद्दल असं सांगितलं जात आहे की, त्यामध्ये ड्युअल-बँड वाय-फाय कनेक्टिव्हिटी मिळू शकते. आणखी वाचा : Poco x4 5G लवकरच भारतात आणतोय १०८ मेगापिक्सेलचा कॅमेरा फोन, जाणून घ्या डिटेल्स OnePlus TV Y1S मॉडेलला २० W स्पीकर मिळतील, तर OnePlus TV Y1S Edge 24W आउटपुट मिळू शकतं. OnePlus Y1S ची भारतातील लॉंचींग डेट १७ फेब्रुवारी आहे, जी OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोनसह संध्याकाळी ७ वाजता लॉंच केली जाईल. ही टीव्ही Amazon वर सुद्धा उपलब्ध होईल. तसंच त्याला बेझल-लेस डिझाइन असेल. या टीव्ही गामा इंजिनने सुसज्ज असतील.