Redmi Note 12 4G Smartphone: रेडमी ही स्मार्टफोन्स उत्पादन करणारी कंपनी आहे. भारतामध्ये या कंपनीच्या उत्पादनांना मोठी मागणी आहे. उत्तमोत्तम फीचर्स, अत्याधुनिक सुविधा, ग्राहकांना परवडेल अशी किंमत अशा काही गोष्टींमुळे भारतीयांचा कल रेडमीच्या स्मार्टफोन्सकडे वळत असल्याचे पाहायला मिळत आहे. या कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये Redmi Note 12 4G हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. सध्या बाजारामध्ये रेडमीच्या Note 12 सीरिजमधील Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro 5G और Redmi Note 12 Pro Plus 5G स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. Redmi Note 12 4G हा Snapdragon 685 प्रोसेसर असलेला जगातील पहिला स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन SD680 ओवरक्लॉक व्हर्जनचा आहे. ३० मार्च रोजी हा स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च केला जाणार आहे.

Redmi Note 12 4G मधील नवे फीचर्स

रेडमीच्या या नव्या स्मार्टफोनच्या डिस्प्लेचा आकार 6.67-इंच आहे. AMOLED डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1080p आहे, तसेच रिफ्रेश दर 120Hz आहे. या डिस्प्लेच्यामध्ये होल पंच कटआउट आहे. या स्मार्टफोनच्या डिस्प्लेमधील ब्राइटनेस पॅनल 1200 nits पर्यंत पोहोचू शकतो असे दावा कंपनीने केला आहे. त्यासह यात 240Hz के टच सॅंपलिंग रेट सपोर्ट आहे. याचे वजन 183.5 ग्रॅम आणि जाडी 7.85 मिलीमीटर आहे. IP53 रेटेड Note 12 4G स्मार्टफोनमध्ये सुरक्षेसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट रीडर ही सुविधा उपलब्ध आहे. यूजर्स बायोमॅट्रिक पद्धतीनेही याचा वापर करु शकतात.

Portfolio, Stock Market, knr constructions Limited Company, knr constructions Limited share, share market, road construction, bridge construction, construction of irrigation projects, Hybrid Annuity Model, BOT,EPC, knr road construction, knr constructions company share,
माझा पोर्टफोलिओ – कामगिरी उजवी, ताळेबंदही सशक्त! केएनआर कन्स्ट्रकशन लिमिटेड
layoffs in 2024 leading it companies cutting jobs in year 2024
‘आयटी’ कंपन्यांच्या मनुष्यबळात घट; देशातील आघाडीच्या टीसीएस, इन्फोसिस, विप्रोचा समावेश
Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
Air India Air Transport Services jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती! ‘या’ पदांवर होणार भरती

या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 685 प्रोसेसरसह 8GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 128GB UFS2.2 स्टोरेज उपलब्ध आहे. मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने याच्या स्टोरेजची क्षमता 1TB पर्यंत पोहोचवता येते. हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित MIUI 14 ऑपरेटिंग सिस्टमवर अवलंबून आहे. 5,000mAh बॅटरी असलेल्या Redmi Note 12 4G ला 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. शिवाय यात ट्रिपल कॅमेरा सेटअप देखील आहे. 50MP प्रायमरी कॅमरा, 8MP अल्ट्रावाइड कॅमरा आणि 2MP मॅक्रो सेंसर यांचा कॅमेरा सेटअपमध्ये समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉल्ससाठी 13MP फ्रंट कॅमेरा जोडण्यात आला आहे.

आणखी वाचा – Paytm यूजर्ससाठी खुशखबर! आता ट्रेन तिकीट कॅन्सल केल्यानंतर मिळणार १००% रिफंड

Redmi Note 12 4G चे वेरिएंट आणि किंमत

Note 12 सीरिजमधील हा स्मार्टफोन 4GB/128GB, 6GB/128GB आणि 8GB/128GB असा वेरिएंटमध्ये लॉन्च केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याच्या बेस वेरिएंटची किंमत 199 युरो इतकी आहे. त्यानुसार भारतामध्ये Redmi Note 12 4G ची किंमत १७,००० रुपये असू शकते. हा स्मार्टफोनच्या रंगामध्ये ओनिक्स ग्रे (onyx gray), आइस ब्लू (ice blue) आणि मिंट ग्रीन (mint green) असे ३ पर्याय असणार आहेत.