scorecardresearch

Redmi Smart Brand Pro लवकरच भारतात होणार लॉन्च; जाणून घ्या ‘खासियत’

सध्या तंत्रज्ञानाचं युग असून भारतासह संपूर्ण जगात स्मार्टवॉच आणि स्मार्टबँडचा बोलबाला आहे.

Redmi-Smart-Band-main
Redmi Smart Brand Pro लवकरच भारतात होणार लॉन्च; जाणून घ्या 'खासियत' (प्रातिनिधीक फोटो/ Indian Express)

सध्या तंत्रज्ञानाचं युग असून भारतासह संपूर्ण जगात स्मार्टवॉच आणि स्मार्टबँडचा बोलबाला आहे. आता परवडणारा स्मार्ट बँड भारतात लॉन्च होण्याच्या तयारीत आहे. गेल्या महिन्यात चीनच्या एका ग्लोबल इव्हेंटमध्ये शाओमीच्या रेडमी ब्रँडने Redmi Smart Pro आणि Redmi Watch 2 Lite लॉन्च केले होते. आता लवकरच ग्राहकांना आपल्या हातात हा बँड घालता येणार आहे. मात्र कंपनीने अधिकृतपणे हा बँड कधी लॉन्च याबाबतची माहिती दिलेली नाही. भारतात रेडमी नोट 11 टी सोबत या बँडचं लॉन्चिंग होऊ शकतं. भारतात रेडमी नोट 11 चं लॉन्चिंग ३० नोव्हेंबरला आहे.

रेडमी स्मार्ट बँड प्रोमध्ये १.४७ इंचाचा एमोलेड टच डिस्प्ले दिला आहे. २८२ पिक्सल डेनसिटीसोबत येतो. यात 8-bit कलर डेप्थ आणि ४५० निट्स पीक ब्राइटनेस आहे. हा स्मार्ट बँड अँड्राइट 6.0 किंवा iOS 10.0 ला सपोर्ट करतो. Xiaomi Wear/Xiaomi Wear Lite अॅप्सचा वापर करावा लागेल. या स्मार्ट बँडमद्ये २०० MAH ची बॅटरी आहे. एकदा का स्मार्ट बँड फूल चार्ज केला, की १४ दिवस याची बॅटरी टिकते असा दावा कंपनीने केला आहे. तर पॉवर सेविंग मोडचा वापर केल्यास २० दिवस वापरता येईल. त्याचबरोबत बँडमध्ये ६ एक्सिस सेन्सर आहेत. पीपीजी हार्ट रेट सेंसर, लाइट सेंसर आहे. डस्ट आणि वॉटर रेसिस्टेंससाठी 5ATM सर्टिफिकेट मिळालं आहे. यात ब्लूटूथ व्ही 5 चा सपोर्ट आणि अपोलो 3.5 प्रोसेसरचा वापर केला गेला आहे. या बँडचं वजन १५ ग्रॅम इतकं आहे.

Realme: बजेट फोननंतर आता कंपनीची अल्ट्रा प्रीमियम फोनसाठी तयारी; i-Phone ला देणार टक्कर

रेडमीच्या बँडमध्ये हार्ट रेट मॉनिटिरिंग फिचर्स आणि SpO2 मॉनिटिरिंग फिचर्स आहे. रक्तातील ऑस्किजनचं प्रमाण याने मोजलं जाणार आहे. त्याचबरोबर स्लीप क्वालिटी मोजली जाते. यात इंडोर आणि आउटडोर रनिंग मोड दिला गेला आहे. तसेच ट्रेडमिल, आउटडोअर वॉकिग मोड, सायकलिंग मोड दिला गेला आहे. वापरकर्त्याच्या गरज समजून म्यूझिक कंट्रोल, नोटिफिकेशन अलर्ट, डीएनडी, इनकमिंक कॉ़ल्स अलर्ट, टायमर आणि अलार्म सारखे फिचर्स दिले गेले आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-11-2021 at 17:21 IST

संबंधित बातम्या