scorecardresearch

Samsung Galaxy S23 Series १ फेब्रुवारीला करणार मार्केटमध्ये एंट्री, ‘हे’ असतील तगडे फीचर्स

Samsung Galaxy S23 series: स्वतःसाठी स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सॅमसंग १ फेब्रुवारीला Galaxy s23 सीरिज लाँच करणार आहे.

Samsung Galaxy S23 Series
Samsung Galaxy S23 सीरिजमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळणार? (Image Source: Onleaks/Twitter)

Samsung Galaxy S23 series: दक्षिण कोरियाची कंपनी असणारी Samsung कंपनी अनपॅक्ड २०२३ या इव्हेंटमध्ये Samsung Galaxy S23 सोबतच आपल्या स्मार्टफोनची सिरीज लाँच करणार आहे. सॅमसंग कंपनीचा Unpacked इव्हेंट १ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. ज्यात Galaxy S23, Galaxy S23+ आणि Galaxy S23 Ultra असे तीन स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत. चला तर जाणून घेऊया काय असेल खास…

‘असे’ खास आहेत ‘हे’ स्मार्टफोन्स

लाँच करताना हे सॅमसंगचा तीनही स्मार्टफोन्स One UI 5.1 हे अँड्रॉइड १३ वर आॅफर केले जाणार आहेत. गॅलॅक्सी एस २३ या फोनला ६.१ इंचाचा फुल एचडी प्लस एमओएलईडी २ एक्स डिस्प्ले मिळणार आहे. तर गॅलॅक्सी एस २३ प्लस या फोनला एचडीआर १० प्लस गोरिला ग्लास असलेला ६.६ इंचाचा डिस्प्ले मिळणार आहे. तीनही फोन हा Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर असणारे असतील आणि यामध्ये ८ जीबी रॅम मिळणार आहे.

(हे ही वाचा : स्मार्टफोन, विंडोज, नव्हे तर ‘Microsoft’ पैसा कमवतो कुठून? ‘हे’ आहे बक्कळ कमाईचे रहस्य )

या सिरीजमधील पहिल्या दोन स्मार्टफोन्समध्ये तीन रियर कॅमेरा मिळणार आहेत. ज्यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) साठी ५० मेगापिक्सलची प्रायमरी लेन्स असणार आहे. दुसरी लेन्स ही १२ मेगापिक्सलची आहे. या फोनला १२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे.

दरम्यान, सॅमसंग कंपनीने त्यांच्या सॅमसंग गॅलेक्सी बुक 3 सीरिजसाठी त्याचे अधिकृत प्री- बुकिंग वेबपेज लाईव्ह करणार आहे. १ फेब्रुवारी ला सकाळी ११.३० वाजता अनपॅक्ड इव्हेंटनंतर लॅपटॉप विक्रीस उपलब्ध होण्याआधी वापरकर्ते प्री-बुकिंग करू शकणार आहेत. हे बुकिंग करत असताना वापरकर्त्यांना अतिरिक्त लाभ मिळणार आहे. सॅमसंग शॉप अ‍ॅप वर २,००० रुपयांचे व्हाउचर रीडिम करता येणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 13:07 IST