News Flash

टेक-नॉलेज : या माहितीचे करू काय?

माझ्या मोबाइलमध्ये आठ जीबीअंतर्गत साठवणूक क्षमता आहे. शिवाय मी १६ जीबीचे कार्डही वापरत आहे.

मोबाइल फोन असो किंवा संगणक, आपल्याकडील माहितीसाठा प्रचंड वाढू लागला आहे

माझ्या मोबाइलमध्ये आठ जीबीअंतर्गत साठवणूक क्षमता आहे. शिवाय मी १६ जीबीचे कार्डही वापरत आहे. असे असतानाही मला सतत मेमरी संपली असे सांगितले जाते. जर मला माहिती साठवायची असेल तर इतर कोणता पर्याय आहे का?

– संतोष पाटील, नगर

उत्तर- मोबाइलफोन असो किंवा संगणक आपल्याकडील माहितीसाठा इतका प्रचंड वाढू लागला आहे. यामुळेच यामुळे साठवणुकीसाठी क्लाऊडचा पर्याय समोर आला. या क्लाऊड तंत्रज्ञानामुळेच आपण आपल्या विविध उपकरणांमधील माहिती आपल्या हातात असलेल्या उपकरणातही पाहू शकतो तसेच माहिती साठवण्यासाठीही मुबलक जागा मिळवू शकतो. यासाठी ड्रॉपबॉक्स, गुगल ड्राइव्ह, वन ड्राइव्ह, बॉक्स असे विविध अ‍ॅप्स अ‍ॅप बाजारात उपलब्ध आहेत. या अ‍ॅपवर लॉगइन करून तुम्ही तुमची माहिती साठवून ठेवू शकता.

* रोकडरहित अर्थव्यवस्थेसाठी यूपीआयचा पर्याय स्वीकारावा असे अनेक जण सांगतात. पण यूपीआय म्हणजे काय ते समजावून सांगा.

– दिनेश मोरे, ऐरोली

उत्तर- स्मार्टफोनचा वापर करून बँक खात्यात पैसे पाठविण्याचे सर्वात सोपे माध्यम म्हणून युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय)कडे पाहिले जाते. बँकिंग क्षेत्रात एटीएमनंतर झालेले हे सर्वात मोठे संशोधन मानले जाते. यामध्ये आपण विक्रत्याला थेट पैसे देऊ शकतो. यासाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन असे दोन्ही पर्याय आहेत. ही सुविधा वापरण्यासाठी आपल्याला डेबिट कार्ड नंबर किंवा आयएफएससी कोड किंवा नेट बँकिंग किंवा ई-वॉलेट पासवर्ड आदी गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज नसते. ही सुविधा वापरण्यासाठी बँकेत खाते असणे आणि मोबाइल क्रमांक नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. हे अ‍ॅप वापरण्यासाठी बँकेच्या ग्राहकाला आपल्या स्मार्टफोनमध्ये यूपीआयधारित अ‍ॅप डाऊनलोड करावे लागते. या अ‍ॅपमधून व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुम्ही आभासी वापरकर्ता क्रमांक तयार करू शकता किंवा तुमच्या बँकेचा आएफएससी कोडही वापरू शकता. सध्या बाजारात बहुतांश सर्वच बँकांचे यूपीआय अ‍ॅप उपलब्ध आहेत. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांमध्ये वापरकर्त्यांची आभासी ओळखच गृहीत धरली जाते. यामुळे हे अ‍ॅप वापरणे इतर पेमेंट अ‍ॅप्सच्या तुलनेत सुरक्षित मानले जाते. तसेच या अ‍ॅपच्या माध्यमातून एका वेळी एक लाख रुपयापर्यंतचे व्यवहार करता येतात. हे अ‍ॅप असलेल्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांक टाकूनही व्यवहार करता येतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 4:42 am

Web Title: electronic gadgets question
Next Stories
1 गमावले ते गवसले!
2 सेल्फीमय फोन
3 अ‍ॅपची शाळा : रेल्वेची माहिती
Just Now!
X