04 March 2021

News Flash

टेक-नॉलेज : अ‍ॅपलॉकचे पर्याय काय?

मला अ‍ॅपलॉक करायचे आहेत. यासाठी बाजारात अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत.

मला अ‍ॅपलॉक करायचे आहेत. यासाठी बाजारात अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत.

मला अ‍ॅपलॉक करायचे आहेत. यासाठी बाजारात अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. मात्र हे अ‍ॅप आपली माहिती चोरतात असे मला वाटते. तर अंतर्गत अशी कोणती सुविधा आहे का?

अमेय निकम, कल्याण

तुम्ही म्हणालात तसे अ‍ॅपलॉक करण्यासाठी बाजारात अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. मात्र हे अ‍ॅप्स आपली माहिती चोरण्याची जास्त शक्यता असते. ते होऊ नये यासाठी अंतर्गत अ‍ॅपलॉक सुविधा वापरणे केव्हाही योग्य ठरते. तुम्ही अ‍ॅण्ड्रॉइड जेलिबीन किंवा त्याच्या पुढचे व्हर्जन वापरत असाल तर तुम्हाला स्क्रीन लॉकचे पर्याय उपलब्ध आहेत. यात साध्या स्क्रीन लॉकसोबतच एनक्रिप्टेड स्क्रीनलॉकही वापरता येतात. यामुळे तुमचा फोन अधिक सुरक्षित राहू शकतो. या फोन्समध्ये पासवर्ड, पीन, पॅटर्न आणि फेस अनलॉक अशा विविध प्रकारच्या लॉकिंग सुविधा उपलब्ध आहेत. पिन किंवा पॅटर्न लॉक करताना ते थोडे वेगळे किंवा अवघड ठेवा म्हणजे मोबाइलचोराला किंवा हॅकरला ते उघडता येणे शक्य होणार नाही. जर कुणाला लॉक उघडता आले नाही तर फोन चोरीला गेला तरी तुमची माहिती तो मिळवू शकणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 1:24 am

Web Title: how to use the applock features
Next Stories
1 टेकन्यूज : ट्विटरवरील ‘अवतार’ माणसात!
2 अनावश्यक ‘अनुस्मारकां’ना अलविदा
3 ‘व्हॉट्सअ‍ॅप’ नवे काय?
Just Now!
X