एखाद्या घटनेवर व्यक्त होण्यापासून ते एखाद्या योजनेची घोषणा करेपर्यंतच्या सर्वच गोष्टी सध्या समाजमाध्यमांवरून होत आहेत. बदलत्या काळानुरूप सरकारी यंत्रणाही बदलू लागल्या आहेत. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून सरकारी यंत्रणांमध्ये बदलाचे वारे वाहू लागले. अनेक ठिकाणी ई-गव्हर्नन्सची तयारी सुरू झाली. देशातील बहुतांश राज्यांमध्ये ई-गव्हर्नन्स लागू होत नाही तोवर स्मार्टफोनक्रांतीने सामान्यांना इंटरनेटशी जोडले गेले. यातूनच एम-गव्हर्नन्सची गरज निर्माण झाली आणि सरकारी यंत्रणा पुन्हा कात टाकू लागल्या. ही प्रक्रिया अद्याप सुरू असली तरी ती वापरण्या योग्य झाली आहे. सरकारी कामे बसल्या जागेवरून करण्यासाठी संकेतस्थळांबरोबरच अनेक सरकारी अ‍ॅप्सही बाजारात उपलब्ध आहेत. ‘एमसेवा’ या सरकारी यंत्रणेने तयार केलेली ही अ‍ॅप्स सुरक्षित आणि उपयुक्त आहेत. पाहुयात असेच काही अ‍ॅप्स.

मायस्पीड
स्मार्टफोन वापरायचा असेल तर सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे इंटरनेट जोडणी. यासाठी आपण मोबाइल कंपन्यांना पैसे देत असतो. आपण ग्राहक व्हावे म्हणून मोबाइल कंपन्या विविध ऑफर्स देत आपण इंटरनेटचा इतका वेग देऊ अशी आश्वासने देतात. मात्र प्रत्यक्षात सांगण्यात आलेला वेग आणि आपल्याला मिळणारा इंटरनेटचा वेग यात मोठी तफावत असते. ही तफावत आहे की नाही हे तपासण्यासाठी दूरसंचार नियमन प्राधिकरणा(ट्राय)ने मायस्पीड नावाचे मोबाइल अ‍ॅप बाजारात आणले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आपण असलेल्या ठिकाणी आपल्याला इंटरनेटचा वेग किती मिळतो आहे याचा तपशील मिळतो. यामध्ये आपल्याला वायफायद्वारे मिळणाऱ्या इंटरनेटचाही वेग समजू शकतो. जर तुम्हाला इंटरनेटचा वेग कमी वाटत असेल आणि त्याविषयी तक्रार नोंदवायची असेल तर या अ‍ॅपच्या माध्यमातून थेट मोबाइल नेटवर्क सुविधा पुरविणाऱ्या कंपन्यांकडे तक्रार करता येऊ शकणार आहे. हे अ‍ॅप वापरण्यासाठी आपल्याकडे किमान अ‍ॅण्ड्राइडची ४.३ ही ऑपरेटिंग प्रणाली असणे आवश्यक आहे.

virar, violation of safety norms, global city, sewage treatment plants
विरार : खासगी सांडपाणी प्रकल्पांकडून सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
public sector enterprises disinvestment in fy 24
निर्गुंतवणूक लक्ष्याची सरकारला पुन्हा हुलकावणी! सरकारी मालकीच्या कंपन्यांमधील हिस्सा विक्रीतून १६,५०७ कोटींचा लाभ
Transfer of a railway official for answering RTI queries Mumbai
माहिती अधिकाराचे उत्तर दिल्याने, रेल्वे अधिकाऱ्याची बदली

एमस्वास्थ्य
आपले आरोग्य निरोगी राहावे यासाठी सध्या अनेक अ‍ॅप्स आणि परिधेय तंत्रज्ञान उपलब्ध आहे. सरकारी स्तरावरही आरोग्य विभागाने अशाच एका अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून डॉक्टर आणि रुग्णांना जोडण्याचे काम केले जाते. या अ‍ॅपमध्ये डॉक्टर आणि रुग्ण दोघेही लॉगइन करू शकतात. डॉक्टरने लॉगइन केल्यावर त्यांना रुग्णाला आपल्या यादीत समाविष्ट करून घ्यावे लागते. रुग्ण यादीत सहभागी झाल्यावर रुग्णावर रिमोट मॉनिटरिंग ठेवणे डॉक्टरांना शक्य होणार आहे. यासोबत बॉडी सेन्सरचे वेगळे अ‍ॅप येते. त्याचा वापर करून डॉक्टरला ईसीजी, रक्तदाब, हृदयाचे ठोके आणि शरीराचे तापमान याचा तपशील मिळू शकतो. जर रुग्णाला काही त्रास होऊ लागला तर त्याचा अ‍ॅलर्ट थेट डॉक्टरकडे जातो. यामध्ये असलेल्या सिंकच्या सुविधेमुळे एमस्वास्थ्यच्या सव्‍‌र्हरवर रुग्णाचा सर्व तपशील ऑफलाइन उपलब्ध होऊ शकतो. याचबरोबर इंटरनेट जोडणी असताना लोकेशनआधारित सेवेच्या माध्यमातून हे अ‍ॅप आपली मदत करू शकते. हे अ‍ॅप वाय-फाय, मोबाइल इंटरनेट जोडणीवर काम करते. अ‍ॅप अ‍ॅण्ड्रॉइडच्या २.३ या ऑपरेटिंग प्रणालीपासून पुढच्या ऑपरेटिंग प्रणालीवर काम करते.

एचपी गॅस बुकिंग
मोबाइल गव्हर्नन्स चमूने घरगुती गॅस बुकिंग सोपे व्हावे यासाठी एचपी गॅस नावाचे अ‍ॅप विकसित केले आहे. यामध्ये आपल्याला घरबसल्या गॅस बुकिंग करता येऊ शकते. इतकेच नव्हे तर आपला गॅस घरी कधी येणार याची माहितीही मिळू शकते. जुनी जोडणी रद्द करणे, नवी जोडणी घेणे, आपण राहात असलेल्या विभागात असलेले गॅसचे वितरक आदीचा तपशील या अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्याला मिळतो. तसेच आपल्याला जर काही तक्रारी असतील तर त्या नोंदविण्याची सोयही यामध्ये देण्यात आली आहे. याचबरोबर घरगुती गॅस वापरासंदर्भातील सुरक्षा सूचनाही यात देण्यात आल्या आहेत. तसेच अ‍ॅपवरील एका क्लिकवरून आपत्कालीन यंत्रणांशी संपर्क साधता येणार आहे. हे अ‍ॅप वापरण्यासाठी तुम्ही एचपी गॅसचे ग्राहक असणे आवश्यक आहे. हे अ‍ॅप अ‍ॅण्ड्रॉइडच्या २.३ या ऑपरेटिंग प्रणालीपासून पुढच्या ऑपरेटिंग प्रणालीवर काम करते.

एमपासपोर्ट सेवा
आपण भारतीय आहोत याचा कागदोपत्री पुरावा असलेल्या कागपत्रांमध्ये पासपोर्ट हे महत्त्वाचे कागदपत्र आहे. नागरिकांना पासपोर्ट मिळण्याची प्रक्रिया सोपी व्हावी या उद्देशाने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या प्रक्रियेत अनेक सुधारणा करत टीसीएसच्या सहकार्याने देशातील ७७ पासपोर्ट सेवा केंद्रांवर सुलभ सेवा उपलब्ध करून दिली आहे. तसेच संकेतस्थळाच्या माध्यमातून घरबसल्या नोंदणी करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण ही सेवा मोबाइलवरही उपलब्ध करून द्यावी या उद्देशाने विभागाने एमपासपोर्ट सेवा नावाचे अ‍ॅप विकसित करून या अ‍ॅपवर पासपोर्ट मिळवण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज असते, किती शुल्क भरावे लागते इथपासून ते आपली पासपोर्टची प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे याचा तपशीलही या अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतो. तसेच आपल्याला पाहिजे त्या ठिकाणचे पासपोर्ट सेवा केंद्र कोठे आहेत याचा तपशीलही अ‍ॅपवर उपलब्ध आहे. तसेच पासपोर्ट नोंदणीसाठी अपॉइनमेंट घेण्याची सुविधाही अ‍ॅपवर देण्यात आली आहे.

इतर अ‍ॅप्स
याशिवाय अनेक लोकोपयोगी आणि सरकारी योजनांची माहिती देणारे अ‍ॅप केंद्र सरकारच्या apps.mgov.gov.in या अ‍ॅप बाजारात आणि गुगल प्लेवर उपलब्ध आहेत. हे अ‍ॅप्स पाहण्यासाठी तुम्ही एम-गोव्ह अ‍ॅप स्टोअर हे अ‍ॅपही या संकेतस्थळवरून डाऊनलोड करून घेऊ शकता. या अ‍ॅपमध्ये तुम्हाला केंद्र सरकारचे सर्व ४९८ अ‍ॅप्स आणि विविध राज्य सरकारांचे अ‍ॅप्स उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्र सरकारचे ६७ अ‍ॅप्सही या अ‍ॅप बाजारात उपलब्ध आहेत.
– नीरज पंडित – niraj.pandit@expressindia.com