28 October 2020

News Flash

ठाण्याजवळ घोडबंदर रोडवर कंटेनर उलटला; चालकाचा जागीच मृत्यू

मोठ्या प्रयत्नांनंतर वाहतुक सुरळीत

ठाणे : उलटलेल्या कंटेनरचा झालेला चक्काचूर.

ठाण्यातील घोडबंदर रोडवर ठाण्याच्या दिशेने येणारा कंटेनर उलटल्याने मोठी वाहतुक कोंडी झाली होती. या अपघातात कंटेनरची पूर्णतः मोडतोड झाली. या भीषण अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला. गायमुख जकात नाका येथे हा अपघात झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, घोडबंदर रोडवरील गायमुख जकात नाक्याजवळील एका वळणार वेगात असलेल्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने तो उलटला. कंटनेरला वेग असल्याने उलटल्याक्षणी त्याच्या समोरच्या बाजूचा पूर्णतः चक्काचूर झाला. यावेळी कंटेनरचा चालक ड्रायव्हर सीटवरचा अडकून पडला होता. त्याचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघाताची माहिती कळताच ठाणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि एका रुग्णवाहिकेलाही पाचारण करण्यात आले.

या अपघातामुळे घोडबंदर रोडवर मोठ्या प्रमाणार वाहतुक कोंडी झाली होती. पलटलेला कंटनेर हटवून वाहतुक पूर्ववत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु होते. अखेर अर्ध्या तासापूर्वी या मार्गावरील वाहतुक सुरळीत झाली आहे. या अपघाताचा पुढील तपास कासारवडवली पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2017 11:31 am

Web Title: container reversed in thane ghodbunder road driver dies on the spot
Next Stories
1 डोंबिवलीत इमारतीला भीषण आग; कापडाच्या गोडाऊनसह प्रिंटींग प्रेस जळून खाक
2 ठाण्यात ३ हजार स्वस्त घरे!
3 बाजाराची मनकामनापूर्ती
Just Now!
X