News Flash

डोंबिवलीत रात्र निवारा केंद्रातील वीजपुरवठा महिनाभर खंडित

डोंबिवलीतील पांडुरंगवाडी येथेही रात्र निवारा केंद्राच्या इमारतीत गेले महिनाभर वीजपुरवठा खंडित असून येथील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

| February 19, 2015 12:02 pm

डोंबिवलीतील पांडुरंगवाडी येथेही रात्र निवारा केंद्राच्या इमारतीत गेले महिनाभर वीजपुरवठा खंडित असून येथील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
पांडुरंगवाडीत चार मजली रात्र निवारा केंद्राची उभारणी २०११ मध्ये करण्यात आली. रेल्वे स्थानक परिसरापासून लांब असल्याने अनेकांना शहरात निवारा केंद्र आहे, याची माहितीच नाही. पालिकेच्या वतीनेही त्याची पुरेशी जाहिरात न झाल्याने या सुविधेपासून बेघर वंचितच आहेत.
दीड वर्षांपूर्वी पालिकेने हे केंद्र गुरुकृपा विकास संघाला नाममात्र एक रुपया भाडय़ाने तीन वर्षांच्या कराराने चालविण्यासाठी दिले. मात्र कंत्राटदारही नागरिकांकडून भाडे वसूल करत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. यावर कंत्राटदार जगदीश पवार यांनी निवारा केंद्र मोफत असले तरी वीज बिल आम्हाला भरावे लागते. महिन्याला पाच ते सहा हजार वीज बिल येत असल्याने एका खोलीमागे ४० ते ५० रुपये भाडे आम्ही आकारतो, अशी माहिती दिली. काही नागरिकांकडून ते हे भाडे वसूल करत असून ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वाखाली संस्था हे केंद्र चालवत असल्याचा त्यांचा दावा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2015 12:02 pm

Web Title: dombivali night shelter power supply broken for month
टॅग : Power Supply
Next Stories
1 गुन्हेवृत्त : नौपाडय़ात तीन सोनसाखळ्या चोरी
2 ठाणेकरांच्या खिशाला कात्री
3 सरकारी शाळांची बत्ती गुल!
Just Now!
X