News Flash

बदलापूरकरांच्या भेटीला फिरते वस्तुसंग्रहालय

या फिरत्या संग्रहालयात यावेळी भारतीय खेळण्यांची प्राचीन परंपरा हा विषय घेण्यात आला आहे.

‘मुझ्यियम ऑफ विल्स’ नामक फिरते संग्रहालय

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचा ठेवा २ ते  ४ डिसेंबरला आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात

‘युथ हॉस्टेल असोसिएशन’च्या येथील शाखेतर्फे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयातील फिरते म्युझियम शहरवासियांच्या भेटीला येणार आहे. डिसेंबर महिन्यातल्या २ ते ४ डिसेंबर दरम्यान बदलापूरातील आदर्श विद्यालयाच्या पटांगणात संग्रहालयाची फिरती बस येणार आहे. त्यामुळे बदलापूरातील विद्यार्थी आणि नागरिकांसाठी  मोठी पर्वणी ठरणार आहे.

‘युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया’च्या बदलापूर शाखेतर्फे बदलापूरकरांसाठी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचा ठेवा उपलब्ध करून दिला आहे. ज्यांना संग्रहालयापर्यंत पोहोचता येत नाही, अशांसाठी मुंबईच्या शिवाजी महाराज संग्रहालयातर्फे फिरते म्युझियम हा उपक्रम सुरू करण्यात आला. मात्र आतापर्यंत राज्यातील प्रमुख शहरांमध्येच ते पोहोचले होते. यावेळी प्रथमच ठाणे जिल्ह्य़ात आणि बदलापूरसारख्या शहरात मुंबईतील सर्वात मोठय़ा संग्रहालयाचा ऐतिहासिक ठेवा येणार, असल्याची माहिती ‘युथ हॉस्टेल असोसिएश’चे उदय कोतवाल यांनी दिली.

रविवार ४ डिसेंबर रोजी हे प्रदर्शन सर्वसामान्यांसाठी खुले राहणार आहे. बदलापूर पूर्वेतील आदर्श विद्यमंदिराच्या पटांगणात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या फिरत्या संग्रहालयाला भेट देता येणार आहे.

खेळण्यांचा प्राचीन इतिहास उलगडणार

या फिरत्या संग्रहालयात यावेळी भारतीय खेळण्यांची प्राचीन परंपरा हा विषय घेण्यात आला आहे. देशातील विविध भागातील लाकडी, लोखंडी, दगड आणि कापडासारख्या नैसर्गिक वस्तूंपासून खेळण्यांची निर्मिती करत असे. या रोजच्या जीवनातील लोककथा, आख्यायिका आणि कल्पनाविस्तारावर आधारावर अनेक खेळणी होती. ‘हडप्पा’ संस्कृतीच्या झालेल्या उत्खनानंतर ही खेळण्यांची संस्कृती पाच हजार वर्षांपूर्वीची असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच देशातील विविध भागातील खेळण्यांची परंपराही वेगळी आहे. त्यांचे आकार, त्यांच्या पद्धती आणि त्यांचे आकर्षणही वेगळे आहे. अशा सर्व गोष्टींचा ठेवा मुंबईतील संग्रहालयाच्या माध्यमातून बदलापूरकरांना पाहता येणार आहे. तसेच त्याबाबत माहिती सांगणारे प्रदर्शन, त्याबाबतचे सादरीकरण आणि काही प्रात्याक्षिकही यावेळी करण्यात येणार आहे. भारतीय खेळण्यांची प्राचीन परंपरा यावेळी उलगडून दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे बदलापूरातील शाळांनी २ आणि ३ डिसेंबर रोजी या फिरत्या संग्रहालयाला भेट द्यावी, असे आवाहन ‘युथ हॉस्टेल असोसिएश’च्या वतीने करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 2:11 am

Web Title: moving museum in badlapur
Next Stories
1 पथदिव्यांच्या उजेडावर प्रस्तावित उन्नत पुलाची काजळी
2 वर्सोवामध्ये तरुणाची दगडाने ठेचून हत्या
3 ठाण्यात विविधरंगी लोकांकिका उलगडल्या..
Just Now!
X