News Flash

आगीशी खेळणारा तंत्रज्ञ

‘आगीशी खेळणे’ हा वाक्प्रचार मराठीत कसा व कधी रूढ झाला आहे हे समजण्यास मार्ग नाही. परंतु या वाक्प्रचारामुळे आपण आगीला किती घाबरतो हे समजून येते.

| May 14, 2015 12:40 pm

‘आगीशी खेळणे’ हा वाक्प्रचार मराठीत कसा व कधी रूढ झाला आहे हे समजण्यास मार्ग नाही. परंतु या वाक्प्रचारामुळे आपण आगीला किती घाबरतो हे समजून येते. इथे विरोधाभास असा आहे की, मानवाने लावलेला पहिला वैज्ञानिक शोध हा अग्नीचा आहे, असे समजले जाते. मानवाने अग्नीचा शोध लावला याचा tv21अर्थ नसíगक स्वरूपात निर्माण झालेल्या अग्नीचे निरीक्षण करून आणि अनुभवातून आपल्या आदिमानवाने आग लावण्याची रासायनिक प्रक्रिया समजून घेतली होती. आपल्या मर्जीप्रमाणे तो काळ, वेळ आणि जागा ठरवून आग पेटवू लागला. म्हणूनच मानवाने लावलेला तो पहिला यशस्वी वैज्ञानिक प्रयोग होता असे म्हणावयास हरकत नाही.
या आगीच्या शोधाचा फायदा मानवाने प्राचीन काळात अन्न शिजवण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी केला. परंतु उत्क्रांतीच्या काळात बदलत्या जीवन समाजरचनेमुळे आणि जीवनशैलीमुळे आगीचे विविध उपयोग माणूस शिकला. अति उष्णतेत धातू वितळून त्याला आकार देऊन त्याचा उपयोग मुख्यत: शस्त्रास्त्रे, पुतळे, वस्तू अशा विविध प्रकारच्या वस्तू बनविता येऊ लागल्या. औद्योगिक क्षेत्रात उष्णता हा उत्पादन निर्मितीतील महत्त्वाचा घटक बनला. म्हणजेच प्रत्यक्षात आगीचा वापर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे माणसाने करून आगीशी खेळ चालूच ठेवला आहे. मात्र, आगीशी अगदी जवळून खेळणाऱ्यांमध्ये ठाण्याच्या डॉ. कुलभूषण जोशी याचे नाव घ्यावेच लागेल.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे चालवण्यात येणाऱ्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाचे ठाण्यातील कामकाज सांभाळणारे रश्मी आणि अरिवद जोशी या दाम्पत्याचा कुलभूषण हा मुलगा. ठाण्यातील  सरस्वती सेकंडरी स्कूलचा माजी विद्यार्थी असलेल्या कुलभूषणने २००६मध्ये मुंबई विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीयरची पदवी मिळवली. त्यानंतर अमेरिकेतील बोस्टन येथील नॉर्थ-ईस्टर्न विद्यापीठात दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करत त्याने एम. एस. ही पदवी मिळवली. हे शिक्षण सुरू असतानाच त्याने ‘कोळसा आणि बायोमास’ म्हणजे उसाचा चोथा यांच्या एकत्रित ज्वलनशीलतेच्या अभ्यासावर एक प्रबंध लिहिला होता. याच विषयावर अधिक सखोल संशोधन करण्याच्या हेतूने त्याने पीएच.डी.साठी वॉर्सेस्टर एमए येथील वॉर्सेस्टर पॉलिटेक्निक इन्स्टिटय़ूटच्या अग्निरक्षक अभियांत्रिकी विभागात प्रवेश घेतला आणि प्राध्यापक अली रंगवाला यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील संशोधन सुरू केले.tv16स्वाभाविकपणे, हवेत अथवा कारखाना परिसरात असणाऱ्या ज्वलनशील पदार्थ मिश्रित धुळीला लागणारया आगीचे नियमन करणारे घटक (ाूं३१२ ॠ५ी१ल्ल्रल्लॠ २स्र्ल्ल३ंल्ली४२ ्रॠल्ल्र३्रल्ल ऋ ूेु४२३्रु’ी ४ि२३२) असा त्याचा विषय होता. औद्योगिक क्षेत्रातील कोळसा, गव्हाचे पीठ, साखर अथवा औषधी पावडर बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये निर्मिती प्रक्रियेत अशा प्रकारची ज्वलनशील पदार्थ मिश्रित धूळ निर्माण होत असते. ही धूळ प्रमाणाच्या बाहेर साठल्यास आणि हवेतील तापमान वाढल्यास आग लागण्याचा धोका उद्भवतो. अशा प्रकारच्या आग लागण्याच्या दुर्घटना जगभर होत असतात. कारखान्यातील निर्मिती क्षेत्रातील ज्वलनशील पदार्थमिश्रित धुळीचा साठा आणि तेथील तापमानाचा निर्देशांक यांचा समतोल राखणे हे वरील धोका आणि दुर्घटना टाळण्याचा महत्त्वाचा भाग आहे. हा सुरक्षेचा संतुल िबदू अधोरेखित करणे हा कुलभूषणचा संशोधनाचा विषय होता. याबरोबरच उष्णता निर्मिती प्रक्रियेत कमीतकमी प्रदूषण व्हावे, यावरही त्याचा अभ्यास सुरू होता. कारखान्यातील भट्टीतून सल्फर डाय ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड हे विषारी वायू परिसरात टाकले जातात. हे दोन्ही वायू मानवी आरोग्यास हानिकारक आहेत. मात्र, कोळसा आणि उसाची चिपाडे एकत्र करून जळणासाठी वापरले तर प्रदूषणाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते, हे कुलभूषणने सिद्ध करून दाखवले. या विषयावरील त्याचा लेख ‘फ्युएल’ या  नियतकालिकात प्रसिद्ध झाला होता. कोळसा जाळताना जर ऑक्सिजनचे प्रमाण तीस टक्क्यांपर्यंत वाढवले आणि नायट्रोजनच्या बदल्यात कार्बनडायऑक्साईड मिसळला तरीसुद्धा प्रदूषणाचे प्रमाण कमी होते, हे कुलभूषण आणि त्याच्या चमूने दाखवून दिले. या संशोधनासाठी एक प्रत्यक्ष प्रयोगशाळा उभारली गेली, जिथे हे सर्व निरीक्षण करता आले. निरीक्षण नोंदीच्या आधारे सुरक्षिततेचा संतुल िबदू अधोरेखित करण्यासाठी कुलभूषणने नवीन गणिती प्रणाली विकसित केली. मे २०१२2 ला कुलभूषण डॉक्टरेट झाला. अगदी कमी वेळात ही पदवी मिळवण्याचा मान त्याने मिळवला.
कुलभूषणचे कौतुक केवळ त्याने कमी वेळात पीएच.डी. पूर्ण केली म्हणून आहेच आणि या तरुण वयात त्याचे त्याच्या संशोधना संदर्भात आठ पेपर प्रसिद्ध झाले आहेत. या विविध पेपरांत त्याने कारखान्यातील निर्मिती क्षेत्रातील उष्णता नियोजनाबरोबर त्यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषण नियंत्रण या संदर्भात केलेले संशोधन मांडले आहेत. कुलभूषणचे सध्याचे कार्यक्षेत्र कोळसा, विविध ज्वलनशील वायू आणि इंधन यांचा निर्मिती क्षेत्रात वापर करतानाचे कारखान्याचे नियोजन आणि आराखडा तयार करणे आहे. विशेषत: कमी नायट्रोजन ऑक्साईड हवेत सोडतील अशा प्रकारचे बर्नर डिझाईन करणे. शेवटी आगीशी खेळू नकोस हा मराठमोळा सल्ला धुडकावून एक मराठी ठाणेकर तरुण खरोखरच प्रत्यक्ष आगीशी खेळून जागतिक पातळीवर ठाणे शहराचे नाव मोठे करीत आहे ही आपल्या सर्वानाच अभिमानाची गोष्ट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2015 12:40 pm

Web Title: science technision who plays with fire
टॅग : Science 2
Next Stories
1 एसटीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा डोंबिवलीत मृत्यू
2 ५६ रु. नव्हे, ५ रु. ६२ पैसे
3 डोंबिवली येथील ‘एम्स’मध्ये रेडिएशन थेरपीची सुविधा
Just Now!
X