लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण- येथील नमस्कार मंडळातर्फे कल्याण परिसरातील ८५ शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने एक कोटी सूर्यनमस्काराचा लक्षांक पूर्ण करण्यासाठीच्या उपक्रमाला सुरूवात झाली आहे. १५ सप्टेंबरपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे.

ऐशी वर्षापासून नमस्कार मंडळातर्फे शरीर सुदृढतेचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम कल्याण मध्ये राबविला जातो. शाळकरी विद्यार्थी या उपक्रमात अधिक संख्येने सहभागी होतात. कल्याण, टिटवाळा भागातील शाळा या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. माजी आ. नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने हा उपक्रम यावेळी सुरू करण्यात आला आहे. महाविद्यालय, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या सहकार्याने नमस्कार मंडळातर्फे हा उपक्रम राबविला जात आहे. विद्यार्थी या उपक्रमात हिरीरिने सहभागी झाले आहेत.

आणखी वाचा-डोंबिवलीत आनंदनगरमध्ये सामासिक अंतर न सोडता सात माळ्याच्या बेकायदा इमारतीची उभारणी

नमस्कार मंडळ, स्वानंद नगर व्यायामशाळेत दररोजच्या सूर्यनमस्कारासाठी सोय करण्यात आली आहे. हा उपक्रमत देश, जागतिक पातळीवर नेण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, असे माजी आ. नरेंद्र पवार यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नमस्कार मंडळाचे अध्यक्ष डॉ. दीपक तेलवणे, उपाध्यक्ष अनिल कुलकर्णी, विवेक रानडे, प्रकाश गद्रे, शामिष जोशी, सौरभ दाते, अरुण देशपांडे, वैभव रिसबुड, व्यायामशाळा प्रशिक्षक श्रीराम अभ्यंकर, महेश पाटील, सुधीर पाटील हा महिनाभराचा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.