ठाणे: जिल्ह्यात शासन परवानगीशिवाय काही अनधिकृत शाळा सुरु असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. पालकांची आणि विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या अश्या शाळांची यादी शिक्षण विभागाने जाहीर केली असून, पालकांनी विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेश घेताना खात्री करून शासनमान्य शाळांमध्येच प्रवेश घ्यावा असे आवाहन माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी केले आहे. जिल्ह्यात खासगी व्यवस्थापनाद्वारे चालवण्यात येणाऱ्या शाळांपैकी १६ माध्यमिक शाळा अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. या अनधिकृत शाळांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आले आहे.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात १५ शाळा अनधिकृतपणे सुरु आहेत. या शाळांमधून राज्य शिक्षण मंडळ, सीबीएसई, आयसीएसई, आयबी इत्यादी नामांकित मंडळांच्या नावाखाली आकर्षक जाहिराती करण्यात येत असून त्यामुळे पालकांची फसवणूक होण्याचा धोका वाढला आहे. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ अंतर्गत अनधिकृत शाळांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.

ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात एकही अनधिकृत शाळा सुरु राहणार नाही यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. असे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.- शिक्षण विभागाकडून पालकांना आवाहनया शाळांकडे माध्यमिक शिक्षणासाठी आवश्यक शासकीय मान्यता उपलब्ध नाही. त्यामुळे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देणे अनुचित असून, भविष्यातील शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांनी सजग राहावे.

शासनमान्य शाळांची यादी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. पालकांनी कोणत्याही प्रवेशापूर्वी अधिकृत शाळांची माहिती तपासून निर्णय घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे.

ठाणे जिल्ह्यातील माध्यमिक अनधिकृत शाळांची यादी

१. आर.एन.इंग्लिश स्कुल, कोनगाव, ता.भिवडी

२. इंग्लिश प्रायमरी माध्यमिक उच्च माध्यमिक स्कुल नवी वस्ती टेमघर ता.भिवंडी३. फकिह इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, न्यु गौरीपाडा, भिवंडी

४. एस.एस.इंडिया हायस्कुल दिवा (पुर्व)५. श्री. विदया ज्योती स्कूल, डावले, ठाणे

६. केम्ब्रीज इंग्लिश स्कूल, मुंब्रादेवी कॉलनी रोड, मुंब्रा७. एस.एस. इंग्लिश हायस्कूल, मुंब्रादेवी रोड, दिवा

८. ओमसाई इंग्लिश स्कुल, दातिवली रोड, दिवा९. पी.टी.आर.एस.डी.इंग्लिश स्कुल, टिटवाळा ता.कल्याण

१०. चेतना हिंदी विद्यामंदिर, कल्याण (पू.)११. ओम साई इंग्लिश स्कुल, पिसवली

१२. रेनबो इंटरनॅशनल स्कूल, ब्रम्हानंद, ठाणे (प.)१३. शारदा इंग्रजी माध्यमिक शाळा

१४. डी.आर.पाटील इंग्लिश मेडियम स्कुल तुर्भे नवी मुंबई१५. अल मुनीहाज सेकंडरी हायस्कुल, बेलापूर, नवी मुंबई</p>

१६. ओईएस इंटरनॅशनल स्कुल सेक्टर १२ वाशी नवी मुंबई