ठाणे पोलिसांनी गुंडाच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली आहे. आयुक्तालय क्षेत्रात १ जानेवारी ते ६ सप्टेंबर या कालावधीत २७२ जणांविरोधात तडीपारीचे प्रस्ताव तयार केले आहेत. २७२ पैकी १६३ जणांना ठाणे, पालघर, मुंबई आणि उपनगरातून एक महिना ते दोन वर्षांच्या कालावधीपर्यंत तडीपार केले आहे. गेल्यावर्षीपेक्षा हे प्रमाण अधिक आहे. आगामी निवडणूका आणि गुंडांवर प्रतिबंध म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे गाव गुंडांचे धाबे आता दणाणले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ठाणे : पारसिक नगर ते वाशी रेल्वे स्थानक टीएमटीची बससेवा सुरू

गुन्हेगारांची टोळी, शारिरीक गंभीर इजेचे दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींविरोधात तडीपारीचा प्रस्ताव पोलिसांकडून केला जात असतो. हा प्रस्ताव परिमंडळाच्या उपायुक्तांकडे आल्यानंतर त्याच्या पडताळणीसाठी तो साहाय्यक पोलीस आयुक्ताकडे दिला जातो. त्यानंतर संबंधित व्यक्तीला चौकशीसाठी बोलावले जाते. त्या व्यक्तीमुळे जिल्ह्यात नागरिकांना काही धोका असल्यास त्याच्या तडीपारी संदर्भाचा अहवाल साहाय्यक पोलीस आयुक्त तयार करत असतात. त्यानंतर पोलीस त्या व्यक्तीला तडीपार करत असतात. त्यानुसार, ठाणे पोलिसांनी आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच, ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी क्षेत्रातील गुंडांविरोधात तडीपारीच्या कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी १ जानेवारी ते ६ सप्टेंबर या कालावधीत २७२ जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यातील आतापर्यंत १६३ जणांना पोलिसांनी तडीपारही केले आहे. गेल्यावर्षी ठाणे पोलिसांनी १४४ जणांचे प्रस्ताव तयार केले होते. त्यामुळे यावर्षी तुलनेने तडीपारीच्या प्रस्तावाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात आगामी महापालिका निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. तसेच गुंडांवर प्रतिबंध म्हणून कारवाईस वेग आला आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली.

हेही वाचा >>> ठाणे : काटई-बदलापूर रोडवर अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत रहिवाशाचा मृत्यू

तडीपारीची कारवाई करूनही काही गुंड शहरात राहत असतात. अशा गुंडांवरही पोलिसांनी कारवाई सुरू केली असून आतापर्यंत १२० जणांना पोलिसांनी गुन्हे दाखल करून अटक केली आहे. त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.ठाणे आयुक्तालय क्षेत्रात १६३ जणांविरोधात तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही कारवाई अशीच सुरू राहणार आहे. – अशोक मोराळे, गुन्हे अन्वेषण शाखा, अतिरिक्त पोलीस आयुक्त, ठाणे पोलीस.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 271 people from thane district in nine months propositions of tadipari amy
First published on: 08-09-2022 at 15:49 IST