ठाणे : भिवंडी येथील नियंत्रण कक्षाचे पोलीस नाईक मिलींद निकम यांच्याविरोधात पाच लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांच्याविरोधातील प्रकरण मिटविण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.

तक्रारदार हे भिवंडीत राहत असून त्यांना पोलीस नाईक मिलींद निकम यांनी सुमारे महिन्याभरापूर्वी संपर्क साधला होता. त्यांच्याविरोधात एक महिला शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार होती. हे प्रकरण मिटविण्यासाठी मिलींद निकम यांनी तक्रारदार यांच्याकडून १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती पाच लाख रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी तात्काळ निकम यांना पाच लाख रुपये दिले. त्यानंतर पुन्हा निकम यांनी तक्रारदार यांच्याकडून दोन लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

हेही वाचा – विलंबाने वीज देयक भरल्यास किती दंड बसतो माहीत आहे काय? मग हे वाचाच

हेही वाचा – वैदर्भियांनो सावधान! आज मुसळधार पावसाचा इशारा; राज्यात इतर ठिकाणचा अंदाज काय? जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, निकम यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी निकम यांच्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.