शुशोभीकरण आणि निर्जंतुकरणाची देयके मंजूर करण्यासाठी ३ लाखांची लाच मागणाऱ्या सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांवर लाच लुचपत विभागाने कारवाई केली यातील १ लाख २० हजार घेतल्या नंतर पुन्हा ३० हजाराचा हप्ता स्विकारताना  सदर कारवाई करण्यात आली 

कल्याण पाटील (वय ५७) असे यातील आरोपीचे नाव आहे. यातील तक्रादार हे कंत्राटदार असून त्यांचे  उड्डाण पूल सुशोभीकरण रंगरंगोटी आणि स्काय वाकचे निर्जंतुकीकरण आदी विविध कामाचे सहा देयके प्रलंबित होते याची देयके मंजूर करून रक्कम देण्यासाठी कार्यकारी अभियंता कल्याण पाटील  शहर  व औद्योगिक विकास महामंडळ रायगड भवन सीबीडी यांनी एकूण ३ लाखांच्या लाचेची मागणी केली होती या पैकी १ लाख २० हजार या पूर्वीच आरोपीने स्विकारले असल्याचा दावा फिर्यादीने केलेला आहे. याच रकमे  पैकी ३० हजाराचा हप्ताची मागणी केली यात ३ देयकांची रक्कम देण्याचे आरोपीने मान्य केले व उर्वरित ३ देयकांचे पाहू असे तोंडी फिर्यादीस  सांगितले होते . या बाबत फिर्यादी यांनी लाच लुचपत विभाग ठाणे यांच्या कडे तक्रार केल्यावर त्याची शहानिशा करण्यात आली व ३० हजाराचा हप्ता घेताना एम जी एम रुग्णालय सीबीडी परिसरात पाटील यांनी हा हप्ता स्वतःच्या कार मध्ये ( एम एच ४६ पी २४५६ ) स्विकारताना  रंगे हात पकडण्यात आले. सदर कारवाई बुधवारी ठाणे लाच लुचपत विभागाने केली आहे. 

byju raveendran raised debt to pay march salaries of employees
बैजूजकडून कर्मचाऱ्यांच्या मार्चच्या वेतनाची कर्ज काढून पूर्तता
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?