ठाणे : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे रविवारी रात्री शाखांना भेट देण्यासाठी ठाण्यात आले होते. या शाखा भेटीच्या कार्यक्रमानंतर ते शरद पवार गटाचे नेते आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. परंतु आव्हाड हे त्यांच्या घरी उपस्थित नव्हते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची आव्हाड यांच्यासोबत भेट होऊ शकली नाही. आव्हाड यांची पत्नी ऋता आव्हाड यांची भेट घेऊनच आदित्य यांना परतावे लागले.

ठाण्यातील ओवळा, मनोरमानगर, चंदनवाडी आणि जिजामाता नगर येथील शाखांना भेट देण्यासाठी आदित्य ठाकरे हे रविवारी रात्री ठाण्यात आले होते. या चारही शाखांबाहेर त्यांनी चौक सभा घेतली होती. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली. रात्री १० वाजता शाखा भेटींचा कार्यक्रम आटोपला. त्यानंतर ते आव्हाड यांच्या ठाण्यातील विवियाना माॅल लगत असलेल्या आव्हाड यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्यासोबत खासदार राजन विचारे, ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा – मनसे नेते अमित ठाकरे उद्या ठाण्यात

हेही वाचा – ठाणे जिल्ह्यतील शहरांपुढे भविष्यातील ‘जलचिंता’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदित्य ठाकरे हे आव्हाड यांच्या निवासस्थानी पोहोचले असता, जितेंद्र आव्हाड घरी नव्हते. आदित्य ठाकरे घरी आल्याचे आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना सांगितले. त्यानंतर अवघ्या १० मिनिटांत आव्हाड घरी पोहोचले. परंतु त्यापूर्वीच आदित्य तेथून निघून गेले होते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासोबत आव्हड यांची भेट होऊ शकली नाही.