ठाणे – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत कोकण विभागात कृषि विभागाच्या वतीने कृषी संजीवनी सप्ताह आणि पी.एम. किसान आधार सीडिंग व इ-केवायसी मोहीम राबविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. या सप्ताहाची १ जुलै, २०२३ रोजी स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी कृषिदिन म्हणून साजरा करून करण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांनी कृषी संजीवनी सप्ताह व पी.एम. किसान आधार सीडिंग व इ-केवायसी मोहिमेमध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक अंकुश माने यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कृषी विभागाच्या वतीने कृषी दिनाच्या दिवशी होणार असून यावेळी विविध कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी, पिक स्पर्धा विजेते शेतकरी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच व्याख्यानमाला देखील आयोजित करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने कोकण विभागात संपूर्ण सप्ताहाचे नियोजन करण्यात आलेले असून विभागातील ६,१७० गावांमध्ये सदर कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाकरिता कोकण कृषी विभागातील कृषी सहाय्यक ते विभागीय कृषी सहसंचालक स्तरावरील सर्व अधिकारी आणि कर्मचारी कार्यक्रमात उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ देखील विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. या सप्ताहात २९ जून कृषी क्षेत्राची भावी दिशा व त्यातील संभाव्य उपाय याबाबत विभागातील सर्व मंडळ कृषी अधिकारी स्थानिक स्तरावरून शेतकऱ्यांची चर्चा करतील.

हेही वाचा >>>घोडबंदरमधील भुयारी गटार योजनेत ५० कोटींचा घोटाळा? प्रकल्प खर्चात कपात होण्याऐवजी वाढ; मनसेचा गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर ३० जून २०२३ कृषी प्रक्रिया तंत्रज्ञान प्रचार दिनानिमित्त विभागातील सर्व कृषी पर्यवेक्षक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मोहीम कालावधीत ऑनलाईन वेबिनार, चर्चासत्र, मार्गदर्शनपर व्याख्याने देखील आयोजित करण्यात येत आहेत. या मोहिमेमध्ये पी.एम. किसान आधार सीडिंग व इ-केवायसी मोहीम देखील राबविली जात आहे. पिक विमा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग नोंदाविणेबाबत मार्गदर्शन केले जात आहे. केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजनांमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणेसाठी तसेच महा-डीबीटी पोर्टलवर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करणेबाबत प्रवृत्त केले जात आहे.