सिंधुदुर्ग : मुस्लीम आरक्षण आणि ईश्वरनिंदा कायद्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन

धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या ना कठोर शिक्षा देणारे पैगंबर मोहम्मद बिल हा कायदा आगामी अधिवेशनात मंजूर करून तात्काळ लागु करावा, अशी मागणी.

Muslim reservation
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं आंदोलन

मुस्लिम शैक्षणिक आरक्षण (पाच टक्के) तात्काळ लागू करा. पैगंबर मोहम्मद बिल म्हणजेच ईश्वरनिंदा कायदा मंजूर करून तात्काळ कायदा लागू करा. या प्रमुख मागण्यांसह अन्य विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्गाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. आपल्या मागण्याबाबतचे निवेदन आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ५ जुलै २०२१ रोजी विधानभवनावर मोर्चा काढून न्यायालयाने मान्यता दिलेल्या पाच टक्के मुस्लिम शैक्षणिक आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच पैगंबर मोहम्मद बिल पास करावे, अशी मागणी केली होती. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. सिंधुदुर्ग जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात नारायण पांचाळ, प्रमोद कासले, श्रीमती उजमा शेख, अमृता चव्हाण, संदीप जाधव, उमर शेख, मुस्ताक शेख, श्याम वराडकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी तसेच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून त्यानी आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.

या मागण्यांमध्ये न्यायालयाने मान्यता दिलेले पाच टक्के मुस्लिम शैक्षणिक आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे., धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या ना कठोर शिक्षा देणारे पैगंबर मोहम्मद बिल हा कायदा आगामी अधिवेशनात मंजूर करून तात्काळ लागु करावा, महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या मिळकतीमध्ये वाढ करून इमाम व मुआजिम यांना मासिक वेतन सुरू करण्यात यावे. संत विचारांचा प्रचार प्रसार करणाऱ्या कीर्तनकार तसेच सर्व समाजातील घटकांचे प्रबोधन करणाऱ्यांना शासनाकडून मासिक मानधन सुरू करण्यात यावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.

तसेच वक्फ बोर्डाच्या जमिनीवर झालेले अवैद्य ताबा हटवून त्या जागेचा अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करावा. सारथी- बार्टी- महा ज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bahujan vikas aghadi protest for demand of muslim reservation and prophet muhammad bill scsg

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या