ठाणे: आज दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या झाली, आणि लोकांनी ती उघड्या डोळ्यांनी बघितली अशा आशयाचे बॅनर ठाण्यात झळकू लागले आहे. महाविकास आघाडीने हे बॅनर बसविले असून ‘अब न्याय जनता करेगी’ असा ही उल्लेख करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हीच ‘ खरी शिवसेना ‘ असल्याचा निवाडा विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिला. या निर्णयाचे शिवसेना शिंदे गटाने स्वागत केले. टेंभी नाका येथील आनंद आश्रमात त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरविले. तर ठाकरे गटाने या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे. त्यांनतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय ताकत असलेल्या ठाण्यात महाविकास आघाडीने बॅनर उभारले आहेत.

हेही वाचा… हरिओमनगर, कोपरीतील रहिवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील मुख्य चौकात हे बॅनर झळकत आहेत. ‘आज दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या झाली, आणि लोकांनी ती उघड्या डोळ्यांनी बघितली..’ ‘अब न्याय जनता करेगी…’ असा उल्लेख त्यामध्ये करण्यात आला आहे. हे बॅनर ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. या बॅनर वरून ठाण्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.