डोंबिवली – डोंबिवलीचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुक्रवारच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या बदनामीचे आणि सामाजिक तेढ निर्माण करणारे फलक काही समाजकंटकांनी गुरूवारी मध्यरात्री डोंबिवली शहराच्या विविध भागात लावले होते. हा प्रकार गुरुवारी मध्यरात्री उघड होताच, वरिष्ठ पोलीस अधिकारी शहरात दाखल झाले. हे फलक छपाई करणाऱ्या उल्हासनगरच्या जाॅली प्रिंटर्सच्या मालकाला ताब्यात घेऊन त्याच्या विरुध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा >>> बदलापुरातही नैसर्गिक नाल्यात बांधकाम; राष्ट्रीय हरित लवादाच्या भूमिकेनंतर बांधकामावर प्रश्नचिन्ह

Washim Constituency, Washim BJP,
VIDEO : भाजपने तिकीट कापले अन् आमदार रडायला लागले; म्हणाले, “पक्षाने माझ्यावर…”
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Man stood still for the national anthem
Viral Video : राष्ट्रगीत सुरू झाले अन्… इथे-तिथे फिरत होते सगळेजण; पण कामगाराची ‘ती’ कृती जिंकेल तुमचं मन
Jayashree Patil held a meeting of the workers and warned of rebellion if he did not get the nomination sangli news
सांगलीत भाजपमध्ये नाराजी तर काँग्रेसमध्ये बंडखोरीचा इशारा
Sharad pawar demand supreme court to freeze clock,
‘घड्याळ’ चिन्हाबाबत उद्या सुनावणी; शरद पवार गटाची बाजू ऐकण्याची तयारी
Maharashtra Assembly Election news in marathi
शिंदे गटाचा विरोध डावलून भाजपचे तिकीटवाटप; गायकवाड, केळकर, नाईक, कथोरे यांच्या नावांची घोषणा
achalpur assembly constituency
अचलपूरच्‍या भाजप उमेदवाराविरोधात पक्षाअंतर्गत सामूहिक बंड; ‘डमी’ उमेदवार दिल्‍याचा आरोप
CM eknath shinde constituency, Bharat Chavan,
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजपच्या माजी नगरसेवकाचे भावी आमदार फलक झळकले

शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस असल्याने भाजपसह सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या शुभेच्छांचे फलक डोंबिवलीत लावले होते. रंगशाळा पब्लिसिटीचे संचालक आणि भाजप कार्यकर्ते विनय पालव यांनीही शहरातील मुख्य रस्ते, कमानी, चौक भागात शुभेच्छा फलक लावले होते. काही समाजकंटकांनी मंत्री चव्हाण यांना डिवचण्यासाठी ‘२० सप्टेंबर, हॅप्पी खड्डे-डोंबिवलीकर’ असा मजकूर असलेले फलक गुरुवारी मध्यरात्री घाईघाईने लावून मंत्री चव्हाण यांची, डोंंबिवलीकर सामाजिक संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. ही माहिती संचालक विनय पालव यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे फलक लावणाऱ्यांविरुध्द कारवाईची मागणी केली.

हेही वाचा >>> तिसऱ्या, चौथ्या मार्गिकेवरुन एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांची वाहतुक सुरूच

हे फलक सामाजिक तेढ निर्माण करणारे आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांची बदनामी करणारे असल्याने पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी डोंबिवलीत दाखल झाले. हे फलक उल्हासनगर येथील जाॅली प्रिंटर्सच्या कामगारांनी लावले असल्याचे रंगशाळा पब्लिसिटीमधील कर्मचारी अजय डावरे यांनी पाहिले होते. पालव, डावरे यांनी ही माहिती पोलिसांना दिली. तातडीने विष्णुनगर पोलिसांचे एक पथक उल्हासनगरला गेले. रात्रीच जाॅली प्रिंटर्सच्या मालकाला डोंबिवलीत आणले. तोपर्यंत रंगशाळाचे संचालक पालव आणि कामगारांनी समाजकंटकांनी शहरात लावलेले बदनामीकारक फलक काढले.

हे फलक कोणाच्या सांगण्यावरून छापले याची माहिती जाॅली प्रिंटर्सचे चालक पोलिसांना देण्यास टाळाटाळ करत होते. अखेर मंत्री चव्हाण यांची बदनामी करणे, समाजात तेढ निर्माण करणारे फलक लावणे आणि शहराचे विद्रुपीकरण केल्याने जाॅली प्रिंटर्सच्या चालक, मालका विरुध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात रंगशाळेचे विनय पालव यांच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. या फलकांवरून डोंबिवलीत गुरुवारी मध्यरात्री दोन ते सकाळी सहा वाजेपर्यंत तणावाचे वातावरण होते. एका हुन्नरी युवा नेत्याच्या इशाऱ्यावरून हे फलक लावण्यात आले असल्याची जोरदार चर्चा डोंबिवलीत सुरू आहे. डोंबिवलीत तणावपूर्ण वातावरण निर्माण करून हा नेता तीर्थाटनासाठी शहराबाहेर निघून गेल्याची चर्चा आहे. या युवा नेत्यामागे एका वजनदार लोकप्रतिनिधीचा हात असल्याची शहरात चर्चा आहे. गेल्या काही महिन्यांपासून काही राजकीय मंडळी मंत्री रवींद्र चव्हाण यांना आव्हानात्मक राजकीय परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामधुनच हा प्रकार घडला असण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. भाजप, शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी याविषयी गप्प आहेत.