डोंबिवली शहर परिसर, रेल्वे स्थानक भागात भुरट्या चोऱ्या वाढल्यामुळे आणि अनेक वेळा फेरीवाले स्कायवाॅकवर व्यवसाय करत असल्याने त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. चोवीस तास स्कायवाॅकवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असल्याने याठिकाणच्या गैरप्रकारांना आळा बसणार आहे.डोंबिवली शहरात भुरट्या चोरांचा वावर वाढला आहे. महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळून जाणे, हातामधील मोबाईल हिसकावणे. सकाळीच कामावर जाण्याच्या गडबडीत असलेल्या प्रवाशांच्या हातामधील मोबाईल हिसकावून पळून जाणे असे प्रकार गेल्या काही दिवसांपासून रेल्वे स्थानक भागात वाढले आहेत. हे गु्न्हे करणाऱ्यांवर नजर असावी आणि त्यांची वेळीच ओळख पटवून त्यांना पकडणे पोलिसांना सोपे जावे म्हणून प्रशासनाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

हेही वाचा >>> मुंबईतील डाॅक्टरची डोंबिवलीतील स्वस्थम आयुर्वेदच्या संचालकांकडून ८५ लाखाची फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक वेळा रात्रीच्या वेळेत भिकारी, गुर्दुल्ले स्कायवाॅकवर निवाऱ्यासाठी येतात. रात्री उशिरा एखादा पादचारी स्कायवाॅकवरुन जात असेल तर त्याला अडवून त्याच्याकडील पैसे, मोबाईल धारदार वस्तुचा दाखवून जबरदस्तीेने खेचून घेतात. अशा गैरप्रकारांवर आळा बसावा. काही वेळा फेरीवाल्यांना हटविणारे पालिका कर्मचारी रात्री नऊ नंतर स्कायवाॅक रेल्वे स्थानक परिसरातून गेले की भाजीपाला विक्रेते आणि इतर फेरीवाले स्कायवाॅकवर येऊन रात्री उशिरापर्यंत व्यवसाय करतात. घरी जाण्यापूर्वी नाशिवंत भाजीपाला, कचरा स्कायवाॅकवर टाकून जातात. या सगळ्या प्रकारांना आळा बसण्यासाठी पालिकेने स्कायवाॅकवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.