डोंबिवली : हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेकडे काहींनी पाठ फिरवली. केवळ काँग्रेसचे लांगुलचालन हा त्यामागचा हेतू आहे. हनुमान चालिसा पठण करतात म्हणून नवनीत राणा यांना तुरुंगात टाकले. त्यांना आता रामभक्त आणि बजरंग बली योग्य जागा दाखवतील, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी डोंबिवलीत केली. कल्याण लोकसभेचे खासदार आणि उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवालाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.

हेही वाचा >>> ‘जय भवानी’स मनाई; आयोगाच्या आदेशावर उद्धव ठाकरे यांची टीका, पक्षाच्या प्रचारगीतातून दोन शब्द वगळण्यास स्पष्ट नकार

cm ekanath shinde inquired earnestly about the health of MLA P N Patil
मुख्यमंत्र्यांकडून आमदार पी. एन. पाटील यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे विचारपूस
CM Eknath Shinde To Uddhav Thackeray
“तोंडावर कधीच आपटलेत, आता त्यांची तोंड फुटतील”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
What Eknath Shinde Said About PM Narendra Modi?
“मोदींना जितक्या शिव्या द्याल..”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला, विधानसभेच्या जागावाटपाबाबत म्हणाले..
Sanjay Raut On Devendra Fadnavis
संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला; म्हणाले, “राजकारणातलं कच्चं मडकं…”
Will Uddhav Thackeray be taken with BJP Chief Minister Eknath Shinde reply pune
उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत घेणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…
Uddhav Thackeray and Sanjay Shirsat
संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “दाढीवाल्यांच्या नादी…”
Shivsena Thackeray group,
उपमुख्यमंत्र्यांना सभेपूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून पनवेलकरांच्यावतीने पाच प्रश्न
cbi likely to issue blue corner notice against prajwal revanna in sex scandal case
प्रज्ज्वलविरोधात सीबीआयची ‘ब्ल्यू कॉर्नर नोटीस’? राहुल गांधी यांचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना पत्र; पीडितांना सहाय्याचे आवाहन

सावित्रीबाई फुले रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, मनसेचे आमदार प्रमोद पाटील, राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदूराव, माजी खा. आनंद परांजपे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आदी उपस्थित होते. संसदेत एका खासदाराने विचारल्यावर श्रीकांत शिंदे यांनी एका दमात हनुमान चालिसा म्हणून दाखविली. आमच्याकडे मात्र हनुमान चालिसा पठण करणाऱ्या खा. राणा यांना तुरुंगाचा रस्ता दाखविण्यात आला. तमाम हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी काहींनी अयोध्येकडे पाठ फिरवली. अशांना रामभक्त योग्य ठिकाणी जागा दाखवतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. कल्याण लोकसभा मतदारसंघात अन्य विकास कामांबरोबर सर्वोपचारी रुग्णालये सुरू करून स्वत: डॉक्टर असलेल्या डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खूप महत्त्वाचे काम केले आहे. आपण डॉक्टर नसलो तरी अनेक ‘शस्त्रक्रिया’ केल्या आहेत. घरात खिळून बसलेल्यांचे गळयाचे पट्टे आपण बाजूला काढायला लावले. ते घरात बसायचे. हळूहळू चालायचे. ते आता वेगात चालायला लागले आहेत, अशी कोपरखळी मुख्यमंत्र्यांनी मारली.

ठाणे जिल्ह्यातील पाण्याची वाढती गरज ओळखून कोणत्याही परिस्थितीत एका धरणाचे काम पूर्ण केले जाईल. आम्ही उंटावरून शेळया हाकत नाही. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात, सामान्यांच्या दारात जाऊन लोकांचे प्रश्न मार्गी लावत आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ आली तर माझे शिवसेनेचे दुकान बंद करीन, असे शिवसेनाप्रमुखांनी म्हटले होते. त्या विचारांना तिलांजली देण्याचे काम काहींनी केले आहे. त्यामुळे जनता त्यांचा हिशेब आता चुकता करील, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

राज्याच्या विकासासाठी केंद्राकडे मदत मागायला आम्ही कमीपणा समजला नाही. काही अहंकारी लोकांना ते कमीपणाचे वाटले आणि त्यामुळे त्यांनी राज्याचे खूप नुकसान केले. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री