कल्याण पश्चिम रेल्वे स्थानका जवळील कोटक महिंद्रा बँकेच्या शाखेत एका ग्राहकाने जवळील बनावट पाचशेच्या चलनी नोटा एटीएमच्या माध्यमातून भरल्या. या नोटांच्या माध्यमातून आपण खऱ्या नोटा नंतर बँकेतून काढू हा विचार ग्राहकाने केला. बँकेच्या हा प्रकार निदर्शनास येताच बँक अधिकाऱ्यांनी तात्काळ महात्मा फुले पोलीस ठाण्यात ही माहिती दिली.

हेही वाचा >>>ठाणे: कामे निकृष्ट दर्जाची झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार; आयुक्तांचा अधिकाऱ्यांना इशारा

कोटक महिंद्रा बँकेचे अधिकारी दीपक वर्दम यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला. चंद्रकांत ढोले या इसमाने जवळील पाचशे रुपयांच्या बनावट नोटा, त्या बनावट आहेत हे माहिती असुनही बँकेत भरणा केल्या. ढोले हे कोटक महिंद्रा बँकेचे ग्राहक आहेत. ते पुणे जिल्ह्यातील म्हाळुगी गाव हद्दीतील लुमेक्स कंपनीत काम करतात.

हेही वाचा >>>कसारा-इगतपूरी दरम्यान इंजिनची तीन चाके रुळांवरून घसरली ; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ढोले हे काही कामानिमित्त कल्याण मध्ये आले होते. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानका जवळून जात असताना त्यांना कोटक महिंद्रा बँकेचे एटीएम दिसले. त्यांनी जवळील पाचशे रुपयांच्या बनावट नोटा एटीएमच्या माध्यमातून आपल्या बँक खात्यावर जमा केल्या. बँक व्यवहाराच्या वेळी या नोटा बनावट असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. तात्काळ एटीएममधील सीसीटीव्ही चित्रण तपासण्यात आले. ढोले नावाच्या इसमाने या नोटा भरणा केल्या असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. बनावट नोटा बँकेत भरणा करुन बँकेची आणि या नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केल्या बद्दल शाखा अधिकारी वर्दम यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.