डोंबिवली- श्रावण महिना सुरू झाल्याने कल्याण, डोंबिवली, ठाणे, बदलापूर शहरांच्या बाजारात केळीच्या पानांची आवक वाढली आहे. दरवर्षी श्रावण महिना सुरू झाला की दसरा सणापर्यंत आदिवासी, दुर्गम भागातील रहिवासी शहरी पट्ट्यात केळीची पाने आणून विकतात. लाखो रुपयांची उलाढाल या केळीच्या माध्यमातून होेते. आदिवासी मंडळींना या माध्यमातून दोन महिने रोजगार मिळतो.

श्रावण महिन्यात केळीच्या पानावर भोजन घेणे आरोग्यदायी मानले जाते. या प्रथेमुळे श्रावणात केळीच्या पानांना अधिक महत्व येते. श्रावण महिन्यात घरांमध्ये काही धार्मिक विधी केले जातात. या विधींसाठी, भोजनासाठी केळीचे पान महत्वाचे मानले जाते. त्यामुळे बाजारातील केळीच्या पानांची आवक वाढली आहे.केळीचे एक अखंड पान १० रुपयांना विकले जाते. दिवसभरात ६० ते ७० केळीची पाने विकली जातात, असे बदलापूर जवळील कोंडेश्वर जंगल भागातून आलेल्या पदमाबाई यांनी सांगितले. त्या डोंबिवली रेल्वे स्थानक भागात केळीच्या पानांची दरवरषी विक्री करतात.

rickshaw stolen from Badlapur last month recovered due to police vigilance
डोंबिवली वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे,बदलापूरमधील चोरीची रिक्षा सापडली
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Due to lack of fitness certificates thousands of vehicles are stuck affecting transportation of essential goods Mumbai news
फिटनेस प्रमाणपत्रे नसल्याने हजारो वाहने अडकली; अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम
vegetable prices increased in pune marathi news
पुणे: भाज्या कडाडल्या, गौरी आगमनानिमित्त भाजी खरेदीसाठी बाजारात गर्दी
Water storage Mumbai, Mumbai dams,
मुंबई : पाणीसाठा ९७ टक्के, पावसामुळे यंदा धरणे काठोकाठ
flood in wardha river
ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू
Gold Silver Price
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! दरवाढीनंतर सोन्याचे भाव झालेत कमी, १० ग्रॅमची किंमत जाणून घ्या
Pune, respiratory disorders, humidity, asthma, allergies, fungal growth, health experts, Sassoon Hospital, health news
पावसाळ्यातील ओलसर हवेमुळे आजारांना निमंत्रण! जाणून घ्या कशी घ्यावी काळजी…

हेही वाचा >>>साथीचे आजार नियंत्रणासाठी कल्याण-डोंबिवलीत तीन लाख घरांचे सर्वेक्षण, १२ लाख रहिवाशांची आरोग्य तपासणी

रोजगाराचे साधन

श्रावण महिना, गणेशोत्सव, दसरा, नवरात्री उत्सवापर्यंत आम्ही केळीची पाने कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुुलंड भागात विकतो. जुलै मध्ये भातशेती, माळरानावरची कामे उरकलेली असतात. त्यानंतर हातांना कोणतेही काम नसते. त्यामुळे ऑगस्ट ते ऑक्टोबर पर्यंत आम्हाला केळीच्या पानांच्या विक्रीतून चांगला रोजगार मिळतो. या रोजगारातून मिळालेला पैसा दैनंदिन उदरनिर्वाह, मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही वापरतो, असे कमलाबाई यांनी सांगितले.कसारा, शहापूर, माहुली किल्ल्याचे जंगल, तानसा अभयारण्य परिसरातील आदिवासी पाड्यांवरील महिला केळीची पाने विक्री व्यवसायात आघाडीवर आहेत.

हेही वाचा >>>घोडबंदर भागात वाहन बंद पडल्याने गायमुख ते नवघर पर्यंत वाहतूक कोंडी

कष्टाचे काम

डोंगराळ भागात सकाळीच जंगलात जाऊन १५० ते २०० केळीची पाने कापून आणण्याचे काम घरातील महिला, पुरूष मंडळी करतात. ही पाने एक गठ्ठा घरी बांधून दुपारपर्यँत आणायची. ती स्वच्छ धुऊन ठेवायची. या पानांचे ५० ते १०० चे गठ्ठे बांधून त्या विक्रीसाठी सज्ज करायचे. हे गठ्ठे डोक्यावरुन रेल्वे स्थानकापर्यंत महिला, पुरूष आणतात. रात्रीच्या आठ ते १० वाजताच्या लोकलने शहरी भागात येऊन हे गठ्ठे घेऊन यायाचे. एक महिला दोन ते तीन गठ्ठ्यांचे ओझे वाहते. ही ओझी रेल्वे स्थानक भागातील आडबाजुला उभी करुन ठेवली जातात. गरजेप्रमाणे गठ्ठ्यातील पाने बाहेर काढून ग्राहकांना विकली जातात. अतिशय कष्टाचे हे काम आहे. जंगलामध्ये जंगली प्राणी, सरपटणारे प्राणी यांचा धोका असतो. याशिवाय डासांचा (पोकळे) सर्वाधिक त्रास होतो, असे या महिलांनी सांगितले.