scorecardresearch

Eknath Shinde Supporters Demonstration of strength : एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ ठाण्यात समर्थकांचे शक्तीप्रदर्शन

Eknath Shinde vs Shivsena, Maharashtra Political Crisis : ठाण्यातील ठेंभी नाका परिसरातील आनंद आश्रमासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे

Public Meeting in Support of Eknath Shinde in Thane
एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ आज ठाण्यात ठेंभी नाका येथे जाहीर सभा होत आहे

Public Meeting in Support of Eknath Shinde in Thane : मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाविरोधात दंड थोडपटले आहेत. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे एकूण ४० आमदार असून त्यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांच्या या भूमिकेचे काही शिवसैनिक समर्थन करत आहेत. तर काही शिवसैनिकांकडून या भूमिकेला कडाडून विरोध केला जातोय. या सर्व घडामोडी घडत असताना आता एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ आज ठाण्यात टेंभी नाका येथे शक्ती प्रदर्शन होत आहे.

शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट यांच्यात कायदेशीर लढाई सुरू झाली असून, महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्याबाबतचा तिढा कायम आहे. १६ बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि गटनेतेपदाच्या नियुक्तीला शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आह़े 

Live Updates

Eknath Shinde and Shiv Sena Live Update : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाण्यातील जाहीर सभेचे अपडेट्स

12:45 (IST) 27 Jun 2022
खासदार श्रीकांत शिंदे शक्तीस्थळावर पोहचले

खासदार श्रीकांत शिंदे हे आनंद दिघे यांचे स्मृतीस्थळ असलेल्या शक्तीस्थळावर पोहचले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने शिंदे समर्थक आहेत.

12:40 (IST) 27 Jun 2022
शेकडो शिंदे समर्थक शक्ती स्थळाच्या दिशेने

टेंभी नाका येथील आनंद आश्रमात जमलेले शेकडो एकनाथ शिंदे समर्थक आता शक्ती स्थळाच्या दिशेने निघाले आहेत.

12:22 (IST) 27 Jun 2022
खासदार श्रीकांत शिंदे आनंद आश्रम येथे दाखल

खासदार श्रीकांत शिंदे आनंद आश्रम येथे दाखल झाले असून, शिंदे समर्थकांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.

12:05 (IST) 27 Jun 2022
एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे आनंद आश्रमात दाखल

एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे आनंद आश्रमात दाखल झाले असून, शिंदे समर्थकांची मोठी गर्दी झालेली आहे. शिवाय जोरदार घोषणाबाजी देखील केली जात आहे.

11:52 (IST) 27 Jun 2022
आनंद आश्रमात जोरदार घोषणाबाजी

आनंद आश्रमात एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांसह, माजी नगरसेवकांचीही जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. एकनाथ शिंदे साहेब आगे बढो, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विजय असो…अमर रहे अमर रहे दिघे साहेब अमर रहे… अशा घोषणा सुरू आहे.

11:28 (IST) 27 Jun 2022
शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट यांच्यात कायदेशीर लढाई सुरू

शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट यांच्यात कायदेशीर लढाई सुरू झाली असून, महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्याबाबतचा तिढा कायम आहे. १६ बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि गटनेतेपदाच्या नियुक्तीला शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आह़े.

11:25 (IST) 27 Jun 2022
टेंभीनाका नाका परिसराला पोलिसांच्या छावणीचे रूप

टेंभीनाका येथील आनंद आश्रमाजवळील रस्ता ठाणे पोलिसांनी बंद केला आहे. या ठिकाणी दंगल नियंत्रण पथक, नौपाडा, ठाणेनगर पोलीस दाखल आहेत.( छाया- दीपक जोशी)

11:20 (IST) 27 Jun 2022
आनंद आश्रमात शिवसैनिक जमा होण्यास सुरूवात

आनंद आश्रमात शिवसैनिक जमा होण्यास सुरूवात झाली असून, बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात आहे.

10:57 (IST) 27 Jun 2022
माजी नगरसेवक प्रकाश शिंदे हे सभेला संबोधित करण्याची शक्यता

एकनाथ शिंदे यांचे भाऊ माजी नगरसेवक प्रकाश शिंदे हे संबोधित करण्याची शक्यता आहे.

10:45 (IST) 27 Jun 2022
पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे दाखल

पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे दाखल हे सभा होणार असलेल्या ठिकाणी दाखल झाले आहे. पोलिसांकडून आनंद आश्रमाची पाहणी सुरू आहे.

10:41 (IST) 27 Jun 2022
कोर्टनाका येथून ठाण्याच्या दिशेने होणारी वाहतूक रोखली

पोलिसांनी कोर्टनाका येथून ठाण्याच्या दिशेने होणारी वाहतूक आनंद आश्रम येथे रोखली आहे.

10:39 (IST) 27 Jun 2022
आनंद आश्रमासमोर मोठा पोलीस बंदोबस्त

ठाण्यातील टेंभी नाका परिसरातील आनंद आश्रमासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे

10:38 (IST) 27 Jun 2022
एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ आज ठाण्यात जाहीर सभा

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ आज ठाण्यात ठेंभी नाका येथे जाहीर सभा होणार आहे.

शिंदे यांच्या या भूमिकेचे काही शिवसैनिक समर्थन करत आहेत.

Web Title: Eknath shinde and shiv sena live update public meeting in thane in support of eknath shinde msr