ठाणे : भिवंडी येथील अजमेरनगर गेट भागात शनिवारी रात्री वृद्ध पादचाऱ्याचा भरधाव दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला. मोहम्मद फारूख (६०) असे मृताचे नाव असून याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी येथील अजमेरनगर गेट परिसरात मोहम्मद फारूख हे वास्तव्यास होते. ते शनिवारी सायंकाळी अजमेरनगर गेट परिसरातून पायी जात होते. त्याचवेळी भरधाव दुचाकीची त्यांना धडक बसली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ भिवंडी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परंतु त्यांना डाॅक्टरांनी मृत घोषित केले. या अपघाता प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.