ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात शनिवारी करोनामुळे एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असतानाच, रविवारी शहरात ११ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ठाणे शहरातील करोना रुग्णांची संख्या ३० इतकी झाली आहे. यापैकी सात रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

ठाणे महापालिका क्षेत्रात करोना विषाणूने पुन्हा डोके वर काढले आहे. गेले काही दिवसांपासून ठाणे शहरात करोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. ठाणे शहरात रविवारी आणखी ११ करोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरातील करोना रुग्णांची संख्या ३० इतकी झाली आहे. यातील एका रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाला. तर, उर्वरित २९ जणांवर उपचार सुरु आहेत. यापैकी २२ रुग्णांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे रुग्ण गृह विलगीकरणात असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर, सात रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या सात रुग्णांपैकी सहा रुग्णांवर खासगी रुग्णालयात तर, एका रुग्णावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.